Today’s Horoscope 28 November 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

आजचे पंचांग – दि. 28.11.2021, वार – रविवार

  • शुभाशुभ विचार- चांगला दिवस.
  • आज विशेष – सामान्य दिवस.
  • राहू काळ – सायंकाळी 04.30 ते 06.00.
  • दिशा शूल – पश्चिमेस असेल.
  • आजचे नक्षत्र – पूर्वा 22.05 पर्यंत नंतर उत्तरा.
  • चंद्र राशी – सिंह.

——————————————

मेष – ( शुभ रंग – मोतिया )

व्यवसायात नवीन हितसंबंध तयार होतील. स्थावराचे व्यवहार मनाप्रमाणे होतील. आज तुमची तब्येत उत्तम असेल. आज प्रत्येक कामात तुम्हाला प्रचंड उत्साह राहील.

वृषभ – ( शुभ रंग – सोनेरी )

आज तुमचे मनोबल उत्तम असेल. इतरांस अशक्य ते शक्य करून दाखवायची जिद्द बाळगाल. विरोधक तुमचा नाद सोडून देतील. गृहिणींनी आज झाकली मूठ झाकलीच ठेवणे हिताचे राहील.

मिथुन – ( शुभ रंग – केशरी )

कार्यक्षेत्रातील काही अडचणी सोडवण्यासाठी तुमच्या जुन्या ओळखी आज कामी येतील. गृहिणींना माहेरची ओढ लागेल. मुलांना अभ्यास बोअर वाटेल.

कर्क – ( शुभ रंग- हिरवा )

वाणीत गोडवा ठेवलात तर अनेक किचकट कामे सोपी होतील. आज पैशाची कमतरता भासणार नाही. एखाद्या क्षुल्लक कारणावरून शेजाऱ्यांशी थोडे बिनसणार आहे.

सिंह – ( शुभ रंग – मरून )

नोकरीच्या ठिकाणी आज वरिष्ठांना गुड मॉर्निंग करणे हिताचे राहील. आज अहंकारास लगाम गरजेचा असेल. अति स्पष्टवक्तेपणा ने काही नाती दुरावतील.

कन्या – ( शुभ रंग – डाळिंबी )

आज शब्द हे शस्त्र आहे याचे भान ठेवून वागलेले बरे, अती आक्रमकता नुकसानास कारणीभूत होईल. दूरचे प्रवास करणार असाल तर सतर्क राहा. मौल्यवान वस्तू जपा.

तुळ – ( शुभ रंग – चंदेरी )

दैवाची उत्तम साथ असल्याने कार्यक्षेत्रात प्रगतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. ध्येय प्राप्ती कडे वेगाने वाटचाल कराल. आज दुपारनंतर एखादा धनलाभ संभवतो.

वृश्चिक – ( शुभ रंग – आकाशी)

आज अत्यंत उत्साही दिवस असून तुमचा कामातील उरक चांगला राहील. नोकरीत तुमच्यावर वरिष्ठांची कृपादृष्टी राहील. हाताखालच्या माणसांवर तुमचा वचक राहील.

धनु – ( शुभ रंग – जांभळा)

आज दैव तुमच्याच बाजूने आहे. कार्यक्षेत्रात श्रम कारणी लागतील घरात थोरांचे मूड मात्र सांभाळावे लागतील. भाविकांना देव दर्शनाची ओढ लागेल.

मकर – (शुभ रंग गुलाबी)

आज तुम्हाला उगीचच इतरांच्या भानगडीत डोकावण्याचा मोह होईल, पण तसे न करता फक्त आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केलेले बरे. आज धाडसाची कामे टाळलेली बरी.

कुंभ – ( शुभ रंग – मोरपिशी)

आज कोणत्याही स्पर्धेत अंतिम विजय तुमचाच राहील. वैवाहिक जीवनात काही जुन्या स्मृती मनास आनंद देतील. प्रेम प्रकरणांना घरच्यांकडून ग्रीन सिग्नल मिळू शकतो.

मीन – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

कार्यक्षेत्रात आत्मविश्वासाने विपरीत परिस्थितीशी झुंज द्याल. इतरांवर विसंबून न राहता स्वावलंबनाचे धोरण हिताचे राहील. येणी वसूल झाल्याने नवीन व्यावसायिकांचा उत्साह वाढेल.

!! शुभम भवतु!!

श्री जयंत कुलकर्णी
9689165424
( ज्योतिषी आणि वास्तू सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.