Todays Horoscope 28 October 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

आजचे पंचांग – वार – गुरूवार, दि. 28.10.2021

  • शुभाशुभ विचार – उत्तम दिवस.
  • आज विशेष – गुरुपुषामृत 9.41 नंतर सूर्योदयापर्यंत. कालाष्टामी.
  •  राहू काळ – दुपारी 1.30  ते 3.00.
  • दिशा शूल – दक्षिणेस असेल.
  • आजचे नक्षत्र – पुनर्वसु 9.41  पर्यंत. नंतर पुष्य नक्षत्र.
  • चंद्र राशी – कर्क.

—————————————

आजचे राशीभविष्य

मेष – ( शुभ रंग- पिस्ता)

आज तुमच्यासाठी गृहसौख्याचा दिवस आहे. कुठेही न जाता घरीच आराम करावा असा तुमचा मूड असेल. मुलांची अभ्यासातील प्रगती पाहून तुम्ही आज समाधानी व्हाल.

वृषभ – (शुभ रंग- डाळिंबी)

आज तुम्हाला मुलांच्या काही शैक्षणिक समस्या भेडसावतील. साहित्यिक मंडळींकडून दर्जेदार लिखाण होईल. कार्यालयीन कामानिमित्त प्रवास होणार आहे.

मिथुन – ( शुभ रंग- निळा)

नोकरीच्या ठिकाणी आज वरिष्ठांचे उत्तम सहकार्य राहिल. नेहमीच्या कामा व्यतिरिक्त एखादी अतिरिक्त जबाबदारी स्वीकारावी लागेल. आज आवक समाधानकारक असेल.

कर्क – ( शुभ रंग- हिरवा)

आज कुठेही आपलीच मर्जी चालावी असा तुमचा हट्ट राहील. मोठेपणा सांभाळण्यासाठी पैसाही खर्च कराल. आपल्या सडेतोड बोलण्याने कुणाच्या तरी भावना दुखावतील.

सिंह – (शुभ रंग -आकाशी)

ज्येष्ठांनी प्रकृतीची अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे. काही आरोग्यविषयक चाचण्या करून घ्याव्या लागतील. अनावश्यक खर्चाचे प्रमाण वाढणार आहे.

कन्या – ( शुभ रंग- सोनेरी)

नवविवाहितांची स्वप्ने साकार होतील. व्यवसायातील उलाढाल वाढेल. सामाजिक जीवनातली प्रतिष्ठा वाढेल. दिवसाच्या उत्तरार्धात एखादा अनपेक्षित लाभ संभवतो.

तूळ – (शुभ रंग- पांढरा)

नोकरीत आज वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागणार आहे. विरोधकांनाही आज चहा पाजून आपलेसे करावे लागेल. अहंकारास जरा लगाम द्या. थोडे वाका पण मोडू नका.

वृश्चिक – ( शुभ रंग -जांभळा)

आत्मविश्‍वासाने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. क्षुल्लक कारणाने आज घरातील मोठ्यांशी मतभेद संभवतात. जे काय करायचे ते मिटल्या तोंडी करा.

धनु – (शुभ रंग -मोरपंखी)

कुठलीही गोष्ट आज सहजसाध्य नसुन अथक परिश्रम गरजेचे आहेत. नवीन ओळखीत आर्थिक व्यवहार नको. वैवाहिक जीवनात आज जोडीदारास फार प्रश्न विचारू नका.

मकर – (शुभ रंग- गुलाबी)

कार्यक्षेत्रात उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अथक प्रयत्ना शिवाय दुसरा पर्याय नाही. बेरोजगारांची वणवण संपून त्यांना रोजगार मिळेल. काही येणी असतील तरी ती मागितल्याशिवाय मिळणार नाहीत.

कुंभ -( शुभ रंग-मोतिया)

अधिकारी वर्गास कामगारांच्या प्रश्‍नात लक्ष घालावे लागणार आहे. आज घरा बाहेर वावरताना रागीट स्वभाव काबूत ठेवा. संध्याकाळी कदाचित डॉक्टरांची भेट द्यावी लागेल.

मीन – (शुभ रंग-चंदेरी)

एखाद्या सामाजिक कार्यात आज पुढाकार घ्याल. गृहिणींना एखाद्या समारंभात मनासारखा मानपान मिळेल. कलाकारांना उत्तम संधी मिळतील.आज प्रेम प्रकरणे फुलतील बहरतील.

!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी
फोन ९६८९१६५४२४
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.