Today’s Horoscope 28 September 2020: जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग…सोमवार, दिनांक…28 सप्टेंबर 2020

  • शुभाशुभ… शुभ दिवस.
  • आज विशेष… साधारण दिवस.
  • राहूकाळ… सकाळी 07.30 ते 09.00
  • दिशा शूल… पूर्वेस असेल.
  • नक्षत्र… धनिष्ठा 22.38 पर्यंत नंतर शततारका.
  • आजची चंद्र राशी… कुंभ.

आजचे राशीभविष्य

मेष – (शुभ रंग – राखाडी)
आज तुम्ही भावनेपेक्षा कर्तव्यास  प्राधान्य देणार आहात. नोकरीच्या ठिकाणी अधिकारी वर्गाकडून उत्तम सहकार्य मिळेल. मित्रांनी केलेल्या खोट्या स्तुतीनेही तुम्ही खुश व्हाल.


वृषभ – (शुभ रंग – हिरवा)
घरात काहीतरी कारणाने वडिलधार्‍यांशी मतभेद होऊ शकतात. आपले म्हणणे त्यांना पटवून सांगण्याचा व्यर्थ खटाटोप न करता, त्यांच्या वयाचा मान राखा.

मिथुन – (शुभ रंग – गुलाबी)
आज जोखमीची कामे टाळलेली बरी जे काही करायचे  ते तब्येतीस जपूनच करा. हातचे सोडून पळत्यामागे अजिबात धावू नका व कायद्याची चौकट अजिबात मोडू नका.

कर्क – (शुभ रंग – पांढरा)
नोकरीत कामाचा ताण प्रचंड वाढेल. वरिष्ठांच्या मागेपुढे करावेच लागणार आहे आणि घरात पत्नीचेही मूड सांभाळणे आवश्यक आहे. वाहन चालवताना निष्काळजीपणा करू नका.

सिंह – (शुभ रंग – मरून)
आज तुम्हाला काही कौटुंबिक प्रश्न चिंताग्रस्त करतील. परंतु जोडीदाराच्या खंबीर सहकार्याने त्यावर सहज मात करता येईल. वादविवादात आपल्या मतावर तुम्ही ठाम राहाल.

.

कन्या – (शुभ रंग – मोरपंखी)
कार्यक्षेत्रात तुमची वाटचाल योग्य दिशेने चालू आहे. यशप्राप्तीसाठी कष्टाशिवाय दुसरा शॉर्टकट नाही. कामाचे तास वाढवावे लागणार आहेत. आज तुम्ही योग्य वेळी अचूक निर्णय घ्याल.

तूळ – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
आज तुमची आर्थिक बाजू भक्कम असेल. मुलांना दिलेला शब्द पाळू शकाल. आज तुम्हाला एखाद्या प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. जुन्या स्मृतींना उजाळा द्याल.


वृश्चिक
– (शुभ रंग – पिस्ता)
काही जुन्या रखडलेल्या योजना पुन्हा सुरू करता येतील. व्यवसायातील स्पर्धकांना तुमचा हेवा वाटेल. गरजूंना आज आपणहून मदत कराल. परिवारात सामंजस्याची भावना राहिल.

धनु – (शुभ रंग – क्रीम)
बऱ्याच दिवसांपासूनची तुमची काही अपुरी स्वप्ने साकार होणार आहेत. आज तुमच्या खिशात पैसा खेळता राहिल. कार्यक्षेत्रात महत्त्वाच्या कागदपत्रांवर सह्या करताना सतर्क रहा. स्थावराचे व्यवहार आज टाळा.

मकर – (शुभ रंग – निळा)
कार्यक्षेत्रात सावधपणे पावले टाकणे गरजेचे आहे. उगीच भावनेच्या भरात कुणाला शब्द देऊ नका. स्वतः च्या स्वार्थावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे. परमार्थ आज नको.

कुंभ – (शुभ रंग – केशरी)
आज तुम्ही एखाद्या क्षुल्लक प्रसंगाने सुद्धा हळवे व्हाल. गरजूंना मदत करण्यासाठी पदरमोड कराल. दानधर्म करताना आधी स्वतःची शिल्लक बघायला हवी.

मीन – (शुभ रंग – आकाशी)
आज तुम्हाला एखाद्या नवीन क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल आणि त्या संधीचे तुम्ही सोने कराल. इच्छित ध्येय साध्य होतील. मोठेपणा घेण्यासाठी काही खर्च करावाच लागेल.

!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन. 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.