Today’s Horoscope 29 December 2020: जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग –  वार  मंगळवार,  ​दि​.  29 डिसेंबर 2020

  • शुभाशुभ विचार – ०८ पर्यंत चांगला दिवस.
  • आज विशेष – श्री. दत्तात्रेय जयंती.
  • राहू काळ – दुपारी ३.०० ते ४.३०.
  • दिशा शूल – उत्तरेस असेल.
  • आजचे नक्षत्र – मृग १७.३२ पर्यंत, नंतर आर्द्रा.
  • चंद्र राशी –  मिथुन.

 

आजचे राशीभविष्य

मेष – (शुभ रंग- चंदेरी)
आज रिकामटेकड्या गप्पा टाळा कारण त्यातून निष्पन्न काहीच होणार नाही फक्त गैरसमज पसरतील. आज टेलिफोन व लाइट बिले भरावी लागणार आहेत.

.

वृषभ – ( शुभ रंग – केशरी)
आवक पुरेशी असल्याने तुमचा मूड छान राहील. वाढत्या स्पर्धेचा सामना करण्यासाठी सज्ज असाल. वैवाहिक जीवनात जोडीदाराची साथ उत्तम राहील. मोजकेच बोला.

मिथुन – (शुभ रंग- पांढरा)
जिवलग मित्र आज योग्य सल्ला देतील. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. मोठ्या लोकांच्या ओळखीने आपले हित साधून घेता येईल. संततीकडून सुवार्ता येतील.

कर्क – (शुभ रंग- क्रीम)
आज दैनंदिन कामातही काही अडथळ्यांना तोंड द्यावे लागेल. हौस मौज करण्यावर काही मर्यादा येतील. काही आवश्यक देणी द्यावी लागणार आहेत. तरुणांनी कुसंगत टाळावी.

 

सिंह – (शुभ रंग- सोनेरी)
अत्यंत आनंदी व उत्साही असा आजचा दिवस असून सर्व कामे विनाव्यत्यय पार पडतील. आज तुमच्यासाठी गृहसौख्याचा दिवस. मुलांची अभ्यासातील प्रगती समाधान देईल.

कन्या – (शुभ रंग-पिस्ता)
महत्त्वाकांक्षांचा पाठलाग करता करता प्रकृतीकडे मात्र तुमचे दुर्लक्ष होईल. सर सलामत तो पगडी पचास हे लक्षात असू द्या. सर्वात आधी आरोग्यास प्राधान्य देणे गरजेचे आहे.

तुळ – (शुभ रंग- भगवा)
नवीन उपक्रमांची सुरुवात उद्यावर ढकलली तर बरे होईल. शासकीय कामे रखडणार आहेत. नोकरीत वरिष्ठ चक्क खोटी आश्वासने देणार आहेत. गृहिणींनी केलेल्या नवसाला आज देव पावेल.

वृश्चिक – (शुभ रंग- पिवळा)
अंगमेहनतीची कामे करणाऱ्यांनी आपल्या सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे आहे. सासुरवाडी कडून काही लाभ होण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना स्टाईल मारू नका.

धनु – (शुभ रंग- निळा)
आज रिकाम्या गप्पांसाठी अजिबात वेळ मिळणार नाही. अत्यंत व्यस्त दिवस असून पत्नीचे सल्ले फार उपयुक्त करणार आहेत. दूरच्या प्रवासात खोळंबा संभवतो.

मकर – (शुभ रंग- हिरवा)
रुग्णांनी डॉक्टरांच्या सूचना तंतोतंत पाळाव्यात. एखादा बरा झालेला आजार उलटण्याची शक्यता दिसते. आज विश्रांतीस प्राधान्य देणे अत्यंत गरजेचे आहे. येणी वसूल होऊ शकतील.

कुंभ – (शुभ रंग -तांबडा)
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना विविध संधी चालून येतील. ब्युटी पार्लर, सौंदर्यप्रसाधनांचे व्यवसाय चांगले चालतील. कलाकार प्रसिद्धीच्या झोतात येतील.

मीन – (शुभ रंग- नारिंगी)
कुटुंबात आर्थिक सुबत्ता नांदेल. मनोबल वाढवणाऱ्या घटना घडतील. कुटुंबियांस पुरेसा वेळ द्याल. आज थोडं मुलांच्या अभ्यासातही डोकावणे गरजेचे आहे.

!! शुभं भवतु!!

 

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.