Today’s Horoscope 29 January 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 29 January 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – रविवार.

29.01.2023.

शुभाशुभ विचार – चांगला दिवस.

आज विशेष- दुर्गाष्टमी.

राहू काळ – सायंकाळी 4.30 ते 06.00.

दिशा शूल – पश्चिमेस असेल.

आजचे नक्षत्र- भरणी 20.21 पर्यंत नंतर कृतिका.

चंद्र राशी – मेष.

—————————————-

मेष – ( शुभ रंग- राखाडी )

जिथे जाल तिथे आज आपलीच मर्जी चालवण्याचा प्रयत्न कराल. महत्त्वाच्या चर्चेत आपले मत मांडण्याची घाई करू नका. इतरांचेही विचार ऐकून घ्या. कायदा तंतोतंत पाळा.

वृषभ (शुभ रंग- आकाशी )

हातात असलेला पैसा जपून वापरा. दिवसाच्या उत्तरार्धात एखादा मोठा खर्च उद्भवू शकेल. जो टाळता येणार नाही. काहीजण सहकुटुंब दूरच्या प्रवासाचा आनंद घेतील.

मिथुन ( शुभ रंग- जांभळा)

आज तुमचा इच्छापूर्तीचा दिवस आहे. आज जे काही पदरात पडेल ते पात्रतेपेक्षा थोडं तरी जास्त असणार आहे. एखादा नवीन उद्योग सुरू करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.

कर्क (शुभ रंग- मोरपिशी )

आज भावनेपेक्षा कर्तव्यसच प्राधान्य देणे योग्य ठरणार आहे. अधिकारी वर्गावर जबाबदाऱ्यांचे ओझे वाढेल. किरकोळ तब्येतीच्या तक्रारी दुर्लक्षित करून चालणार नाहीत.

सिंह (शुभ रंग- क्रीम )

आज कोणतेही गोष्ट सहज मिळणार नाही. तरीही तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना दैवाचे पाठबळ नक्कीच मिळेल. सज्जनांचे पाय घराला लागतील. घरातील वडीलधाऱ्या मंडळींना दुखावू नका.

कन्या ( शुभ रंग- लाल )

कार्यक्षेत्रात वावरताना सावधानता बाळगायला हवी. काही चुकीची माणसे संपर्कात येतील. कमी श्रमात जास्त लाभाचा मोह टाळायला हवा. आज कोणतेही धाडस नको, नाकासमोर चाला.

तूळ ( शुभ रंग- पांढरा )

कौटुंबिक सदस्यात सामंजस्य राहील. जोडीदारास अभिमान वाटण्याजोगी कामगिरी तुमच्या हातून होईल. व्यवसायातील स्पर्धेचा सामना यशस्वीपणे कराल.

वृश्चिक (शुभ रंग- स्ट्रॉबेरी )

नोकरीच्या ठिकाणी साहेबांची मर्जी सांभाळावी लागेल. हितशत्रूंचा उपद्रव चालूच राहणार आहे. कामात चूक होणार नाही याची दक्षता घ्या. आज तुमची तब्येत थोडीशी नरमच असेल.

धनु- (शुभ रंग- डाळिंबी )

काही रसिक व हौशी मंडळी कामावर दांडी मारूनही मौजमजेस प्राधान्य देतील. स्वतःचे लाड पुरवण्यासाठी खर्च कराल. नवोदित कलाकार संधीचे सोने करतील.

मकर ( शुभ रंग- लाल )

आज कौटुंबिक सदस्यात सुसंवाद राहील. मुलांची शाळेतील कामगिरी कौतुकास्पद असेल. पूर्वी हरवलेली एखादी वस्तू आज घरातच सापडण्याची शक्यता आहे.

कुंभ (शुभ रंग – हिरवा )

आज घराबाहेर वावरताना रागीट स्वभावावर नियंत्रण असू द्या. व्यर्थ वाद टाळायला हवेत. एखाद्या अडचणीच्या प्रसंगी शेजाऱ्यांची मदत घ्यावी लागेल. अहंकार बाळगू नका.

मीन -(शुभ रंग – पिस्ता )

उद्योग व्यवसायात मिळकत उत्तम असल्याने आज तुमचे मनोबलही उत्तम असेल कार्यक्षेत्रात प्रभावी नेतृत्व करू शकाल. तुमचा उत्साह पाहून विरोधक नमते घेतील.

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.