Today’s Horoscope 29 March 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – Today’s Horoscope 29 March 2023
वार – बुधवार.
29.03.2023
शुभाशुभ विचार- 8 नंतर चांगला दिवस.
आज विशेष- दुर्गाष्टमी.
राहू काळ – दुपारी 12.00 ते 1.30.
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आजचे नक्षत्र – आर्द्रा 13.36 पर्यंत नंतर पुनर्वसू.
चंद्र राशी – मिथुन.
—————————————-
मेष ( शुभ रंग- आकाशी )
शेजाऱ्यांशी झालेले मतभेद दूर होऊन सलोखा वाढेल. काही जणांना आज तातडीने प्रवासासाठी निघावे लागेल. घराबाहेर वावरताना क्रोधावर लगाम ठेवा. आज आईच्या आज्ञेत रहा.

वृषभ (शुभ रंग- राखाडी )
वाढत्या खर्चातही पैशाची कमतरता भासणार नाही. आज संध्याकाळी काही येणी अनपेक्षितपणे वसूल होतील. महत्त्वाच्या कामासाठी थोडी भटकंती करावी लागेल.

मिथुन ( शुभ रंग- पिवळा )
आज भावनेच्या भरात येऊन तुम्ही काही चुकीचे निर्णय घ्याल. उपवारांना मनपसंत स्थळांचे प्रस्ताव येतील. एखाद्या समारंभात तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा आज चांगला प्रभाव पडेल.

कर्क (शुभ रंग- मोतिया)
पैसा येण्याआधीच तो जाण्याचे अनेक मार्ग तयार असतील. एखाद्या प्रसंगी नाईलाजाने खर्च करावाच लागेल. आज एखाद्या मॉलमध्ये फेरफटका माराल, उंची वस्त्र खरेदी होईल.

सिंह (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस. कमी श्रमातही जास्त लाभ पदरात पडण्याची शक्यता आहे जिवलग मित्र तुमचा शब्द झेलतील दिवसाचा पूर्वार्ध लाभाचा.

कन्या ( शुभ रंग- जांभळा)
आज तुम्ही भावनेपेक्षा जास्त कर्तव्यास प्राधान्य द्याल. कामाच्या व्यापात आज महत्त्वाच्या घरगुती प्रश्नांकडे दुर्लक्ष होईल. कुटुंबीयांना वेळ देणे आज जरा अवघडच होईल.

तूळ ( शुभ रंग- मोरपंखी)
आज दैवाचे पाठबळ उत्तम असल्याने तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यशाची खात्रीच बाळगा घरात एखादे धार्मिक कार्य करण्याचे बेत आखाल. वडीलधाऱ्यांचा मान राखा.

वृश्चिक (शुभ रंग- मरून)
आज कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. तुमचे हितशत्रू कदाचित तुमच्या मित्रांमध्येच लपलेले असू शकतात. कोणतीही धाडसाची कामे आज करू नका. सतर्क रहा.

धनु (शुभ रंग- केशरी)
कौटुंबिक वातावरण सामंजस्याचे असल्याने तुम्ही आज कार्यक्षेत्रातही आपले महत्त्व सिद्ध करू शकाल. अडचणीच्या प्रसंगी जोडीदाराची खंबीर साथ राहील.

मकर ( शुभ रंग- निळा )
कोणतीच गोष्ट आज सहज साध्य नसली तरीही तुमची काही येणी असतील तर ती आज वसूल होण्याची शक्यता आहे. तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना आज दैवाचे पाठबळ नक्कीच लाभेल.

कुंभ (शुभ रंग – सोनेरी)
नवोदित कलाकार मंडळीही प्रसिद्धीच्या स्वतःत राहतील. हौशी मंडळींना चैन करण्यासाठी आज पैसा पैसा उपलब्ध होईल. बरेच दिवसांनी आज जुन्या मित्रमंडळींच्या सहवासात रमाल.

मीन (शुभ रंग – गुलाबी ) – Today’s Horoscope 29 March 2023
आज तुम्हाला काही घरगुती प्रश्नात लक्ष घालणे गरजेचे वाटेल. मुलांच्या अभ्यासातही डोकावण्याची गरज आहे. आज काही रसिक मंडळी सहकुटुंब एखाद्या सहलीचे नियोजन करतील.

शुभम भवतु

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 9689165424

Pimpri News : पवना धरणात ऑगस्ट पर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा; पाणीपुरवठ्याबाबतीत आराखडा तयार करा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.