Today’s Horoscope 29 May 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 29 May 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य
आजचे पंचांग –
वार – सोमवार
29.05.2023.
शुभाशुभ विचार- उत्तम दिवस.
आज विशेष- महेश नवमी.
राहू काळ – सकाळी 7.30 ते 09.00.
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आजचे नक्षत्र – उत्तरा.
चंद्र राशी – सिंह 08.55 पर्यंत नंतर कन्या.
मेष – ( शुभ रंग- तांबडा )
कोणतीही गोष्ट आज सहज साध्य होणार नसली तरीही तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना दैव नक्कीच साथ देईल. तुमची काही येणी असतील तर ती वसूल होण्याची दाट शक्यता आहे.
वृषभ (शुभ रंग- पिस्ता )
काही रसिक मंडळी तर आज कामावर दांडी मारूनही करमणुकीस प्राधान्य देतील. नवोदित कलाकार मंडळी प्रसिद्धीच्या झोतात राहतील. खेळाडू स्पर्धा जिंकतील.
मिथुन ( शुभ रंग- हिरवा )
नोकरदारांना कामावर दांडी मारून मस्त घरी आराम करावासा वाटेल. काही घरगुती प्रश्नात लक्ष घालणे आज अत्यंत गरजेचे असेल. गृहिणींना मुलांच्या अभ्यासात डोकवावेच लागेल.
कर्क (शुभ रंग- पांढरा )
शेजाऱ्यांशी किरकोळ कारणाने झालेले गैरसमज दूर होऊन सलोखा वाढेल. काही जणांना अचानक जवळपासच्या प्रवासास निघावे लागण्याची शक्यता आहे आज क्रोधावर लगाम ठेवणे गरजेचे आहे.
सिंह (शुभ रंग- स्ट्रॉबेरी )
आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस असून मनी योजाल ते आज तडीस न्याल. कमी श्रमात ही जास्त लाभ पदरात पडू शकेल. आज जिवलग मित्र तुमचा शब्द झेलतील.
कन्या ( शुभ रंग- गुलाबी )
वाढत्या खर्चातही पैशाची कमतरता भासणार नाही कार्यक्षेत्रात तुमच्या नेतृत्वगुणांना चांगला वाव मिळेल. गायक कलाकारांना आज रसिक मनसोक्त दाद देतील.
तूळ ( शुभ रंग- सोनेरी )
आज दिवसच खर्चाचा असल्याने बचतीचा विचारही नको. संध्याकाळी एखाद्या मॉलमध्ये फेरफटका माराल. उंची वस्त्र खरेदी कराल. आज आपल्या जोडीदारास एखादे सरप्राईज गिफ्ट द्याल. यथाशक्ती दानधर्मही कराल.
वृश्चिक (शुभ रंग- चंदेरी)
आज तुम्ही जिथे जाल तिथे आपलीच मर्जी चालवण्याचा प्रयत्न कराल. अति उत्साहात आज काही चुकीचे निर्णय घ्याल. उपवारांना आज मनपसंत स्थळांचे प्रस्ताव येतील.
धनु- (शुभ रंग- राखाडी)
आज ऑफिसमध्ये कामाचा प्रचंड व्याप असणार आहे. कामाच्या व्यापात घरगुती प्रश्न दुर्लक्षित होतील आज तुम्हाला कुटुंबीयांची नाराजी पत्करावी लागेल. आज अति व्यस्त दिवस.
मकर ( शुभ रंग- मोतिया )
आज दैवाचे पाठबळ उत्तम असल्याने तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यशाची खात्री बाळगा. खरात एखादे धार्मिक कार्य करण्याचे तुम्ही बेत आखाल. सजनांचा सहवास लाभणार आहे
कुंभ (शुभ रंग – निळा )
हितशत्रू कदाचित मित्रांमध्येच लपलेले असू शकतील. कोणतीही धाडसाची कामे आज नकोत. सावध रहा. आज कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका.
मीन -(शुभ रंग – आकाशी )
कौटुंबिक सदस्यात सुसंवाद असल्याने तुम्ही आज कार्यक्षेत्रातही आपल्या कर्तव्यास योग्य न्याय देऊ शकाल अडचणीच्या प्रसंगी आज पत्नीची खंबीर साथ असणार आहे.
शुभम भवतु
श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क- 9689165424