Today’s Horoscope 29 November 2022 जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – Today’s Horoscope 29 November 2022
वार – बुधवार.
29.11.2022.
शुभाशुभ विचार- चांगला दिवस.
आज विशेष- चंपाषष्ठी. स्कंदशष्ठी.
राहू काळ – दुपारी 03.00 ते 04.30
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आजचे नक्षत्र – श्रवण सकाळी 08.38 पर्यंत नंतर धनिष्ठा.
चंद्र राशी – मकर 11.51 पर्यंत नंतर कुंभ.

—————————————-
मेष – ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी )
नोकरीच्या ठिकाणी उच्च अधिकारी वर्गाशी सलोखा वाढेल. कामाच्या व्यापात आज कुटुंबीयांसाठी वेळ देणे अवघड होईल संध्याकाळी प्रिय मित्रांचा सहवास लाभेल.

वृषभ (शुभ रंग- हिरवा )
घरात वडीलधाऱ्या मंडळींशी वैचारिक मतभेद होतील, परंतु त्यांच्या शब्दाचा मान रखाल. खोटी आश्वासने देणारे मित्र भेटतील दुरूनच त्यांना रामराम करा.

मिथुन ( शुभ रंग- केशरी )
नवीन व्यावसायिकांनी स्पर्धकांना कमजोर समजू नये. नोकरदारांनी नोकरीच्या ठिकाणी आज नियमांचे पालन काटेकोरपणे करावे हीतशत्रू टपूनच बसलेले आहेत, सतर्क रहा.

कर्क (शुभ रंग- भगवा.)
व्यवसायात भागीदारांशी सलोख्याचे संबंध असतील. वैवाहिक जीवनातही आज गोडी गुलाबी असून काही जुन्या आठवणी मनाला आनंद देतील. आशादायी दिवस

सिंह (शुभ रंग- चंदेरी )
नोकरीच्या ठिकाणी विरोधकांच्या काही उचापती चालूच राहणार आहेत. आरोग्यविषयक तक्रारींची वेळीच दखल घेणे गरजेचे आहे दुकानदारांची थकलेली उधारी वसूल होईल.

कन्या ( शुभ रंग- नारंगी)
नोकरदारांना नोकरीत बदल करायचा असेल तर योग्य संधी चालून येतील. नवोदित कलाकारांच्या अथक प्रयत्नांना यश येईल. रुग्णांना आज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळेल.

तूळ ( शुभ रंग- निळा) Today’s Horoscope 29 November 2022
जमीन खरेदी विक्रीचे काही व्यवहार मार्गी लागतील. विद्यार्थ्यांना किचकट विषयातही गोडी निर्माण होईल. गृहिणींना तर आज अजिबात उसंत मिळणार नाही.

वृश्चिक (शुभ रंग- लाल)
आजचा दिवस खूपच धावपळीचा आहे तुमचा आत्मविश्वास वृद्धिंगत करणारी एखादी घटना घडेल. उच्च अधिकारी असाल तर सह्या करण्यापूर्वी कागदावरचा मजकूर नीट वाचून घ्या.

धनु- (शुभ रंग- मोतिया)
आज तुमची मिळकत उत्तम असेल गृहिणींना अचानक येणाऱ्या पाहुण्यांची उठबस करावी लागेल. आज प्रवास त्रासदायक होऊ शकतात. फार अर्जंट नसतील तर टाळा.

मकर ( शुभ रंग- मोरपंखी )
महत्त्वाचे निर्णय विचारांती घ्या. अडचणीच्या प्रसंगी आज जोडीदाराने दिलेले सल्लेच महत्त्वाचे असतील. कमी श्रमात जास्त लाभाच्या अपेक्षेने फक्त निराशाच पदरात पडू शकते.

कुंभ (शुभ रंग – राखाडी)
आज मीपणा तुमच्या प्रगतीच्या आड येऊ शकतो. मृदू वाणीने बरीच अवघड कामे सोपी होतील. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी तातडीने प्रवासाला निघण्याची गरज भासेल.

मीन -(शुभ रंग – गुलाबी )
आज केलेल्या कोणत्याही वाटाघाटी सकारात्मकतेने पार पडतील. जिवलग मित्राकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. शेअर्सच्या व्यवहारातील तुमचे अंदाज अचूक ठरतील.

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.