Today’s Horoscope 29 November 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग (Today’s Horoscope 29 November 2023)
आजचा दिवस – बुधवार.
तारीख – 29.11.2023
शुभाशुभ विचार – उत्तम दिवस.
आज विशेष – सामान्य दिवस.
राहू काळ – दुपारी 12.00 ते 01.30
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आज नक्षत्र – मृग 13.59 पर्यंत नंतर आर्द्रा.
चंद्र राशी – वृषभ.
—————————–
मेष – ( शुभ रंग – मोरपंखी)
आज घाई गर्दीत घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता जास्त आहे. मित्रांच्या नादी लागून जे पटत नाही ते करायला जाऊ नका. प्रवासात नवे हितसंबंध जुळून येतील.

वृषभ ( शुभ रंग- राखाडी)
आज खिशात पैसा खेळता राहील. विरोधकही मैत्रीचा हात पुढे करतील. काही नाती जपायची असतील तर आज जरा अतिस्पष्टवक्ते पणास आवर घालावा लागेल.

मिथुन – ( शुभ रंग- डाळिंबी)
आज काही मनाजोगत्या घटना तुमचा कामातील उत्साह वाढवतील. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. आज तुम्ही इतरांच्या भांडणातही यशस्वी मध्यस्थी करू शकाल.

कर्क – ( शुभ रंग – चंदेरी) Today’s Horoscope 29 November 2023
आजचा दिवस खर्चाचा आहे. आज तुम्हाला काटकसर जमणे शक्य नाही. मनसोक्त खर्च करा. ज्येष्ठांची अध्यात्माकडे रुची वाढेल. तरुणांच्यात विलासी वृत्ती वाढणार आहे.

सिंह -( शुभ रंग – मरून)
आजचा तुमचा कामातील उत्साह इतरांना प्रेरणा देईल. आज तुमच्यासाठी यशदायी दिवस असून एखाद्या नव्या व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी आज उत्तम दिवस आहे.

कन्या – ( शुभ रंग- सोनेरी)
नोकरीच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचे दडपण असेल. आज बिनचूक कामास प्राधान्य द्यावे. व्यावसायिक मंडळी वाढत्या स्पर्धेचा सामना करण्यासाठी सज्ज असतील.

तूळ ( शुभ रंग- भगवा)
सरकार दरबारी असलेली कामे रखडतील. श्रद्धाळू गृहिणींचा देवधर्म चालूच राहील. आध्यात्मिक मार्गात असलेल्या मंडळींना एखादी दिव्य प्रचिती येईल.

वृश्चिक ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
मोठे आर्थिक व्यवहार आज टाळा. शारीरिक कष्टांची कामे करणाऱ्या कामगारांनी आपल्या सुरक्षिततेची काळजी घ्यायला हवी. घरात जोडीदाराच्या मतास प्राधान्य देणे हिताचे.

धनु (शुभ रंग- गुलाबी)
आज तुमचे मनोबल उत्तम असल्याने तुम्ही कार्यक्षेत्रातील आव्हाने सकारात्मकतेने स्वीकाराल. समोर येणारी प्रत्येक व्यक्ती तुमच्या प्रभावात असेल. घरात जोडीदाराच्या कलाने घ्या.

मकर (शुभ रंग- निळा)
कार्यक्षेत्रात अथक परिश्रमांच्या साह्याने प्रगतीची चक्रे गतिमान ठेवता येतील आज कुणालाच काही सल्ले न देता स्वार्थ साधून घेण्यास प्राधान्य देणे हिताचे राहील.

कुंभ – (शुभ रंग- आकाशी)
आज अत्यंत उत्साहाने दिवसाची सुरुवात कराल. सर्व कामे आज विना व्यत्यय पार पडतील. एखादा नवीन विषय शिकून घेण्याकडे आज तुमचा कल राहील.

मीन ( शुभ रंग- पांढरा)
आज कुटुंबीयांना पुरेसा वेळ देण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. मुलांची अभ्यासातील प्रगती समाधानकारक राहील. कलेच्या क्षेत्रातील नवोदिकांना प्रयत्न वाढवावे लागतील.

श्री जयंत कुळकर्णी.
ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.
फोन 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.