Today’s Horoscope 03 February 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 03 February 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग 

वार – शुक्रवार.

03.02.2023.

शुभाशुभ विचार – उत्तम दिवस.

आज विशेष- प्रदोष.

राहू काळ – सकाळी 10.30 ते 12.00.

दिशा शूल – पश्चिमेस असेल.

आजचे नक्षत्र- आर्द्रा 6.18  पर्यंत नंतर पुनर्वसू.

चंद्र राशी – मिथुन.

—————————————-

मेष – ( शुभ रंग- जांभळा )

कार्यक्षेत्रात आज काही वादग्रस्त प्रश्न तुम्ही यशस्वीरित्या सोडवाल. काही जुन्या ओळखी आज कामी येतील. शेजारी आपलेपणाने डोलावतील. आज आईचे मन दुखावू नका. मुलांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल.

वृषभ (शुभ रंग- मोतिया )

आज कार्यक्षेत्रात तुमचे प्रभावी वक्तृत्व कमी येईल. तुमच्या कामातील उत्साहाने तुमचे विरोधकही प्रभावित होतील. विवाह विषयक चर्चा होकाराकडे झुकतील.

मिथुन ( शुभ रंग- पांढरा )

जिथे जाल तिथे आज तुमचीच मर्जी चालू शकेल. नवीन व्यावसायिकांचे श्रम कारणी लागतील व यशाची चाहूल लागेल. वैवाहिक जीवनात गोडी गुलाबी राहील.

कर्क (शुभ रंग- चंदेरी )

आज मोठे आर्थिक व्यवहार सावधपणे करायला हवेत. रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया होतील. दूरच्या प्रवासात सावध राहणे गरजेचे. मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यायला हवी.

सिंह (शुभ रंग- डाळिंबी )

जसे चिंताल तसे होणार आहे. आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस असून तुमची काही अपुरी स्वप्न साकार होतील. व्यावसायिकांचे कर्ज प्रस्ताव मंजूर होतील. छान दिवस.

कन्या ( शुभ रंग- लाल )

उद्योगधंद्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस असून नोकरीत वरिष्ठांचे तुम्हाला सहकार्य राहील. अधिकार योग चालून येतील. हाताखालचे लोक नम्रतेने वागतील. आज तुम्ही म्हणाल ती पूर्व.

तूळ ( शुभ रंग- पिस्ता )

महत्त्वाच्या घरगुती प्रश्नात आज वडीलधाऱ्यांचे मत अवश्य घ्या. वाहतुकीचे नियम मोडू नका. दंड भरावा लागेल. आज अति आक्रमकता नुकसानास कारणीभूत होईल.

वृश्चिक (शुभ रंग- स्ट्रॉबेरी )

नवीन ओळखीत लगेच विश्वास टाकू नका. आज मित्र ही दगा देतील. कार्यक्षेत्रात ही सावधगिरीने पावले टाकणे गरजेचे आहे. गाडी चालवताना स्टंट करू नका.

धनु- (शुभ रंग- निळा )

व्यवसायात तुम्ही वाढत्या स्पर्धेचा सामना करण्यासाठी सज्ज असाल. वादविवादात आपलीच मते इतरांवर लादू शकाल. आज वैवाहिक जीवनात सामंजस्य राहील.

मकर ( शुभ रंग- गुलाबी )

काही जुने आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ मंडळींना काही आरोग्यविषयक चाचण्या करून घ्याव्या लागतील. विद्यार्थ्यांना स्पर्धेत हमखास यश मिळेल.

कुंभ (शुभ रंग – राखाडी )

आज उच्च राहणी व उच्च विचारसरणी असे तुमचे धोरण राहील. व्यक्तिमत्व विकासावर भर द्याल. गृहिणी आज पार्लर साठी आवर्जून वेळ काढतील आज सहकुटुंब चैन कराल.

मीन -(शुभ रंग – मोरपंखी )

धंद्यात येणी असतील तर ती वसूल होतील. कार्यक्षेत्रात आज स्वतःचे महत्त्व सिद्ध करू शकाल. आजची संध्याकाळ प्रिय मित्रमंडळींच्या सहवासात मजेत जाईल. छान दिवस.

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.