Today’s Horoscope 30 August 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग  वार – सोमवार, दि. 30 ऑगस्ट 2021

  • शुभाशुभ विचार – चांगला दिवस.
  • आज विशेष – श्रीकृष्ण जयंती.
  • राहू काळ – सकाळी 7.30 ते 9.00.
  • दिशा शूल – पूर्वेस असेल.
  • आजचे नक्षत्र – कृतिका 06.39 पर्यंत नंतर रोहिणी.
  • चंद्र राशी –  वृषभ.

_______________________

आजचे राशीभविष्य

मेष – ( शुभ रंग- चंदेरी)

मित्रमंडळीत तुमच्या शब्दास मान राहील उच्चशिक्षितांना मोठ्या पॅकेजच्या नोकऱ्यांचे प्रस्ताव येतील. आज काही येणी असतील तर वसूल होतील. प्रिय पाहुण्यांचे घरी आगमन होईल.

वृषभ ( शुभ रंग -पिस्ता)

अविश्रांत मेहनतीच्या जोरावर ध्येयाकडे तुमची वाटचाल सुरूच राहील. तुमचा कामातील उरक चांगला राहील तब्येत उत्तम राहील. मुले मन लावून अभ्यास करतील.

मिथुन (शुभ रंग- गुलाबी)

नोकरदारांवर कामाचा प्रचंड ताण राहील. कार्यक्षेत्रात काही मनाविरुद्ध घटना घडल्याने नैराश्य येईल. आज वरिष्ठांशी नमते घ्यावे व सहकाऱ्यांशी जुळवून घ्यावे. व्यर्थ वाद टाळावेत.

कर्क (शुभ रंग- क्रीम)

आज कार्यक्षेत्रात बिकट प्रसंग सहज सोडवू शकाल. वैवाहिक जीवनात लाडिक रुसवे-फुगवे असतील. आज दोघात तिसऱ्या ला प्रवेश देऊ नका. काही रुसलेले आप्तस्वकीय जवळ येतील.

सिंह (शुभ रंग- मरून)

अनपेक्षितपणे काही रक्कम हाती येईल त्याचप्रमाणे खर्चाचेही विविध मार्ग खुणवतील. भावनेच्या भरात इतरांना दिलेले शब्द आता पाळावे लागणार आहेत. भावी योजना इतक्यात उघड करू नका.

कन्या (शुभ रंग- हिरवा)

काही महत्त्वाच्या कामास विलंब होईल बेरोजगारांची भ्रमंती चालूच राहणार आहे. हाती असलेल्या पैशाची उधळपट्टी नको. शब्द हे शस्त्र आहे याचे भान असू द्या. गरजेइतकेच बोला.

तूळ ( शुभ रंग- आकाशी)

कार्यक्षेत्रात पूर्वीच्या अथक परिश्रमाचे फळ दृष्टिक्षेपात येईल. कला-क्रीडा क्षेत्रातील मंडळींनी प्रयत्न वाढवायला हवेत. आज जे काही कराल ते तब्येतीला जपूनच करा.

वृश्चिक (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

अति दुनियादारी टाळून आज आपल्या संसारीक समस्यांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. काही अटीतटीच्या प्रसंगी जोडीदाराचे सल्ले उपयुक्त ठरतील. पत्नी आज घरी आतुरतेने वाट पाहत असेल.

धनु (शुभ रंग- केशरी)

काही जुन्या आरोग्याच्या तक्रारी डोके वर काढणार आहेत. पथ्य पाणी सांभाळा अन्यथा आजार बळावेल. धंद्यातील मोठे निर्णय भागीदारांना विश्वासात घेऊनच घ्या. नोकरदारांना ओव्हर टाईम करावे लागेल.

मकर (शुभ रंग -जांभळा)

आज तुम्ही आपल्याच धुंदीत व आपल्याच मस्तीत असाल. इतरांचे विचार समजून घेण्याची तुमची मानसिकताच नसेल. तरुणवर्गाने व्यसनांच्या आहारी जाऊ नये.

कुंभ (शुभ रंग -मोतीया)

आज तुमचा रिकाम्या चर्चेत व वादविवादात व्यर्थ वेळ फुकट जाईल. महत्त्वाची कामे दुर्लक्षित होतील. आज तब्येत जरा नरम-गरम राहील. गृहिणींना माहेरची ओढ लागेल.

मीन ( शुभ रंग- डाळिंबी)

आज एखाद्या मॉल मध्ये फेरफटका माराल. बिनधास्त खर्च कराल. चैन करण्यासाठी हाती पुरेसा पैसा असेल. आज बचतिचा विचारही करू नका. महत्त्वाचे दस्तऐवज मात्र सांभाळा.

!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी.
फोन ९६८९१६५४२४
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.