Today’s Horoscope 30 December 2020: जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग –  वार  बुधवार …. ​दि​.  30 डिसेंबर 2020

 

  • शुभाशुभ विचार – चांगला दिवस.
  • आज विशेष – साधारण दिवस.
  • राहू काळ – दुपारी १२.०० ते १.३०.
  • दिशा शूल – उत्तरेस असेल.
  • आजचे नक्षत्र -आर्द्रा १८.५५ पर्यंत, नंतर पुनर्वसु
  • चंद्र राशी –  मिथुन.

आजचे राशीभविष्य

मेष – ( शुभ रंग – राखाडी)

प्रवासात झालेल्या काही नवीन ओळखी पुढे भविष्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरतील. कार्यालयीन कामाचे महत्त्वाचे दस्तऐवज सांभाळा. कोणत्याही कागदपत्रांवर सह्या करताना सतर्क रहा.

 

वृषभ – ( शुभ रंग- हिरवा)

विविध मार्गाने आर्थिक लाभ होतील. व्यवसायात पूर्वी घेतलेले निर्णय योग्य ठरतील. नवकवींच्या लिखाणास प्रसिद्धी मिळेल. पैशाअभावी रखडलेली कामे पुढे सरकतील.

मिथुन – ( शुभ रंग -मोरपंखी)

अत्यंत उत्साहवर्धक दिवस असून नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या गुणांची दखल घेतील. वाढीव जबाबदाऱ्या समर्थपणे पेलू शकाल. दूरच्या प्रवासात खोळंबा संभवतो.

कर्क – (शुभ रंग- मोतिया)

आज हाती असलेला पैसा जपून वापरा, अनावश्यक खर्चावर लगाम अत्यंत गरजेचा आहे. आनंदाच्या भरात कोणालाही वचने देऊ नका कारण ती पाळता येणार नाहीत.
 

सिंह – ( शुभ रंग -पिस्ता)

आज आवक पुरेशी असल्याने मनासारखा खर्च करता येईल. मित्र आज दिलेले शब्द पाळतील. आजचा दिवस तुमच्यासाठी  लाभाचा असून तुमची काही अपुरी स्वप्ने साकार होतील.

कन्या – ( शुभ रंग -क्रीम)

आज भावना व कर्तव्य यात तुमच्या मनाची काहीशी ओढाताण होण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात काही बिकट प्रसंगांना चतुराईने तोंड द्याल. योग्य ठिकाणी अधिकार वापरावेत लागणार आहेत

तुळ – (शुभ रंग- केशरी)

महत्त्वाचे निर्णय घेताना आज तुमची द्विधा मनस्थिती होणार आहे. घरातील वडीलधार्‍या मंडळींच्या कलाने घ्यावे लागेल. भक्तीमार्गात असलेल्यांना सद्गुरु कृपेचा लाभ होईल.

.

वृश्चिक – ( शुभ रंग – निळा)

कार्यक्षेत्रात आज काही मनाविरुद्ध घटना घडण्याची शक्यता आहे. आपल्याच माणसाकडून विश्वासघात होण्याची शक्यता दिसते. आज क्रोधावर लगाम गरजेचा राहील.

धनु – (शुभ रंग- भगवा)

काही महत्त्वाचे व्यावसायिक करारमदार यशस्वी होतील. कौटुंबिक जीवन समाधानी असून आज प्रकृती स्वास्थ्य ही उत्तम राहील. पती-पत्नीमध्ये एकमत राहील.

मकर – (शुभ रंग- पांढरा)

नोकरीच्या ठिकाणी आज प्रामाणिकपणे काम कराल. आज काही इतरांनी केलेल्या चुका ही निस्तराव्या लागतील. कुणाकडून येणी असतील तर मागायला लाजू नका.

कुंभ – (शुभ रंग- नारिंगी)

आज तुम्हाला मुलांच्या बाबतीत काही योग्य निर्णय घ्यावे लागणार आहेत. त्यांच्या शिस्तीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. प्रेम प्रकरणांना आज ग्रीन सिग्नल आहे.

मीन – (शुभ रंग- तांबडा)

स्थावर इस्टेटी विषयी रखडलेल्या कामांना चालना मिळेल. मानसिक शांतता लाभेल व आरोग्यही उत्तम राहील. गृहिणी आज मौल्यवान खरेदी करतील. मुले अभ्यासात एकाग्रता साधतील.
!! शुभं भवतु!!

 

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.