Today’s Horoscope 30 March 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग,  वार – मंगळवार, दि​. 30 मार्च ​2021

 

  • शुभाशुभ विचार – उत्तम दिवस.
  • आज विशेष – संत तुकाराम महाराज बीज.
  • राहू काळ – दुपारी 03.00 ते 04.30.
  • दिशा शूल – उत्तरेस असेल.
  • आजचे नक्षत्र – चित्रा 12.22 पर्यंत नंतर स्वाती नक्षत्र.
  • चंद्र राशी – तूळ.

 

 

आजचे राशीभविष्य

मेष – (शुभ रंग – क्रीम)
नोकरदारांवर कामाचा ताण वाढेल. तब्येतही जरा नरमच असून आजचा दिवस कंटाळवाणा जाईल. ध्येयाचा पाठलाग करता करता प्रकृतीकडे दुर्लक्ष होईल. पत्नी आज महत्त्वपूर्ण सल्ले देईल.

वृषभ – (शुभ रंग – मरून)
नवीन ओळखीतून व्यवसायवृद्धी होईल. विरोधकांशी धूर्तपणे वागून स्वतःचा स्वार्थ साधून घ्याल. तब्येतीच्या बाबतीत पैशाची काटकसर करून चालणार नाही.

मिथुन – (शुभ रंग – हिरवा)
कुटुंबीयांमधील प्रेम वृद्धिंगत होईल. मुले आज अभ्यासास प्राधान्य देतील. नवीन कलाकारांची प्रसिद्धीची हौस भागेल. रुग्णांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा दिसून येईल.

कर्क – (शुभ रंग – पांढरा)
कोर्टकचेरीची कामे पुढे सरकतील. शेजाऱ्यांकडून काही सुवार्ता येतील. आज आईच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी. आज परिवारास पुरेसा वेळ देण्याचा प्रयत्न कराल.

सिंह – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
प्रकृती ठणठणीत असल्याने आज तुम्हाला प्रत्येक कामात चांगला उत्साह राहील. वेळेवर पुरेसा पैसाही उपलब्ध होईल. कठोरपणे बोलून कोणाचे मन दुखवू नका.

कन्या – (शुभ रंग – पिस्ता)
आज मित्रपरिवारात तुमचा शब्द अंतिम राहील. विरोधक तुमच्या चुका काढतील. संयम ढळू  देऊ नका. पत्नी आज योग्य तेच सल्ले देणार आहे. शेजारी जरा तिरकस नजरेने बघतील.

तूळ – (शुभ रंग – मोतिया)
उच्च अधिकारी वर्गास बढती बरोबर बदलीही स्वीकारावी लागेल. आज खर्च आवाक्याबाहेर जाणार आहे. काहीजणांना अचानक प्रवासास निघावे लागेल. जोडीदाराशी एकमत राहील.

वृश्चिक – (शुभ रंग – सोनेरी)
कंजूषपणा सोडून काही अत्यावश्यक खर्च करावेच लागतील. कर्ज हप्ते भरावे लागणार आहेत. खर्च वाढता असला तरी पैशाची कमतरता भासणार नाही.

धनु – (शुभ रंग – आकाशी)
नोकरीधंद्यात उत्साही दिवस राहील.  योग्य वेळी अधिकार वापरावे लागणार आहेत. प्रतिष्ठितांच्या ओळखी आज कामी येतील.  आज एखाद्या मित्रांस मदत कराल.

मकर – (शुभ रंग – निळा)
दैनंदिन कामातही अडथळे येणार आहेत आरोग्याच्या काही जुन्या तक्रारी डोके वर काढण्याची शक्यता आहे. आज नोकरदारांना जास्त वेळ थांबून काम करावे लागेल.

कुंभ – (शुभ रंग – लाल)
आज तुमचे मानसिक संतुलन बिघडवणारे काही प्रसंग घडतील. महत्त्वाचे व्यावसायिक करार मदार उद्यावरच ढकलले तर बरे होईल. जोडीदाराकडून फार अपेक्षा नकोत.

मीन – (शुभ रंग – क्रीम)
उद्योगधंद्यातील वाढत्या स्पर्धेस समर्थपणे तोंड द्याल. नोकरदारांना ऑफिसमध्ये साहेबांचे व घरात पत्नीचेही मूड सांभाळावे लागतील. संध्याकाळी सत्संगात रमाल.

!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.