Today’s Horoscope 30 March 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – Today’s Horoscope 30 March 2023 
वार – गुरूवार.
30.03.2023
शुभाशुभ विचार- उत्तम दिवस.
आज विशेष- श्रीराम नवमी गुरुपुष्यामृत ( रात्री १० नंतर सूर्योदयापर्यंत)
राहू काळ – दुपारी 1.30 ते 3.00
दिशा शूल – दक्षिणेस असेल.
आजचे नक्षत्र – पुनर्वसू 22.59 पर्यंत नंतर पुष्य.
चंद्र राशी – मिथुन 16.15 पर्यंत नंतर कर्क.
—————————————-
मेष – ( शुभ रंग- तांबडा )
बऱ्याच दिवसांपासून रखडलेल्या घरगुती कामात आज लक्ष घालाल संध्याकाळी आर्थिक व्यवहार जपून करा विद्यार्थ्यांना आज अभ्यास कंटाळवाणा वाटेल.

वृषभ (शुभ रंग- मोतिया )
आज प्रचंड आत्मविश्वासाने तुम्ही घराबाहेर पडाल. कार्यक्षेत्रात नवीन आव्हाने स्वीकाराल. वाणीत गोडवा ठेवून अनेक किचकट प्रश्न सहजच मार्गी लावाल.

मिथुन ( शुभ रंग- आकाशी )
महत्त्वाच्या चर्चेत आपल्याच मतावर अडून राहाल. अति आत्मविश्वास आज नुकसानास कारणीभूत ठरू शकेल. इतरांचेही ऐकून घेण्याची तयारी ठेवा सुसंवाद गरजेचा आहे.

कर्क (शुभ रंग- राखाडी) Today’s Horoscope 30 March 2023 
नवीन व्यवसायात आपली कुवत ओळखूनच आर्थिक उलाढाली केलेल्या बऱ्या. ज्येष्ठ मंडळींनी हाती असलेली पुंजी जपून वापरावी. ज्येष्ठ मंडळींना सत्संगातून मनशांती लाभेल.

सिंह (शुभ रंग- स्ट्रॉबेरी )
कार्यक्षेत्रातील तुमचे महत्त्व वाढेल. इतरांस न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकाराल व त्या पूर्णही कराल. व्यापारांची आवक मुबलक राहील. आज तुम्हाला थोडी अहंकाराची बाधा होईल.

कन्या ( शुभ रंग- जांभळा)
नोकरीच्या ठिकाणी काही अनुकूल घटना घडतील सहकारी तुमच्या मताचा आदरच करतील. अधिकारांचा गैरवापर मात्र टाळा. कायद्याच्या चौकटी बाहेर जाऊ नका.

तूळ ( शुभ रंग- मोरपंखी)
नोकरी धंद्यात काही मनाविरुद्ध घटना घडल्याने नैराश्य येईल. विरोधक आज तुमच्या चुका शोधण्याच्या प्रयत्नात असतील. अधिकारांचा वापर जरा जपूनच करा. ज्येष्ठ मंडळींनी उपासनेत खंड पडू देऊ नये.

वृश्चिक (शुभ रंग- केशरी)
आजचा दिवस उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने तितकासा अनुकूल नाही. आज तब्येत थोडी नरमच असेल. पती-पत्नी मधील वादावर मौन हा रामबाण उपाय ठरेल.

धनु- (शुभ रंग- मरून)
नोकरीच्या ठिकाणी प्रमोशनची चाहूल लागेल. अधिकार योग चालून येतील. सकारात्मक दृष्टिकोन बाळगा आज तुम्हाला पत्नीच योग्य सल्ले देणार आहे.

मकर ( शुभ रंग- सोनेरी )
नोकरीच्या ठिकाणी कामे पूर्ण करण्यासाठी कामाचे तास वाढवावे लागतील. जुनी दुखणे अंगावर काढू नका. काही येणे असतील तर मागायला लाजू नका गृहिणीसाठी आज अतिव्यस्त दिवस.

कुंभ (शुभ रंग – निळा)
नोकरदार वरिष्ठांच्या मागेपुढे करतील. कलाकारांच्या उमेदवारी यश येऊन त्यांना उत्तम संधी चालून येतील. आजारी व्यक्तींच्या प्रकृतीत आज चांगली सुधारणा दिसून येईल.

मीन -(शुभ रंग – चंदेरी )
घर सजावटीसाठी काही पैसा खर्च कराल. सर्व कामे आज विनाव्यत्यय पार पडतील. आनंदी व उत्साही दिवस. कलाक्षेत्रातील मंडळींना मात्र प्रयत्न वाढवावे लागतील.

शुभम भवतु

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 9689165424

Pimpri : प्रशांत पाटील यांचा शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्काराने सन्मान

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.