Today’s Horoscope 30 May 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 30 May 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – मंगळवार

30.05.2023.

शुभाशुभ विचार- चांगला दिवस.

आज विशेष- दशहरा समाप्ती.

राहू काळ – दुपारी 03.00 ते 4.30.

दिशा शूल – उत्तरेस असेल.

आजचे नक्षत्र – हस्त.

चंद्र राशी – कन्या.

—————————————-

मेष – ( शुभ रंग- आकाशी )

नोकरदारांवर वरिष्ठांची कृपादृष्टी राहील. पूर्वीचे कष्ट कारणी लागतील. आज तब्येत थोडी नारमच असेल. पती-पत्नी मधील मतभेद आज दुपारनंतर निवळतील.

वृषभ (शुभ रंग- हिरवा )

तुमच्या प्रामाणिक मेहनतीस नशिबाची ही उत्तम साथ मिळेल. कार्यक्षेत्रात काही नवीन संधी चालून येतील. नवोदित कलाकार मिळालेल्या संधीचे सोने करतील.

मिथुन ( शुभ रंग- पिस्ता )

मंदावलेल्या व्यापार उद्योगास गती येईल. महत्त्वाच्या चर्चेत आज तुम्ही आपल्या मतावर ठाम असाल. प्रॉपर्टी चे अपुरे व्यवहार मार्गे लागतील. विद्यार्थ्यांनी पालकांच्या आज्ञा पाळाव्यात.

कर्क (शुभ रंग- स्ट्रॉबेरी )

ज्यात आपल्याला काही कळत नाही त्यात उगीच डोकं घालू नका. अति आत्मविश्वासही नुकसानास कारणीभूत ठरू शकतो. आज काही अति हुशार मंडळी भेटतील. जरा कमी बोललेले बरे.

सिंह (शुभ रंग- सिंह )

कार्यक्षेत्रात नवीन आव्हाने आत्मविश्वासाने स्वीकाराल. आज वाणीत गोडवा ठेवाल तर अनेक किचकट कामे सोपी होतील. गृहिणी आज पाहुण्यांची उडबस आनंदाने करतील.

कन्या ( शुभ रंग- सोनेरी )

कार्यक्षेत्रात तुमच्या शब्दाला मान राहील. व्यापाऱ्यांची आवक मुबलक असेल. आज कारण नसताना इतरांच्या भानगडीत लक्ष घालाल. दूरच्या प्रवासात खोळंबा संभवतो.

तूळ ( शुभ रंग- गुलाबी )

आर्थिक व्यवहारात सावध असणे गरजेचे आहे. आज एकाच्या भरवशावर दुसऱ्याला शब्द देऊ नका. आज फक्त आपल्या स्वार्थाकडे लक्ष द्या परमार्थ अजिबात परवडणार नाही.

वृश्चिक (शुभ रंग- निळा)

नोकरीच्या ठिकाणी काही मनाजोगत्या घटना घडतील. वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. विरोधकही आज माघार घेतील. संततीकडून महत्त्वाचे समाचार येऊ शकतात.

धनु- (शुभ रंग- राखाडी)

आज तुम्ही आपल्या ओळखी वापरून इतरांची कामे कराल. हाताखालच्या माणसांवर तुमचा अंकुश राहील. विरोधकांनाही तुमच्या कामाची पद्धत आता आवडू लागेल.

मकर ( शुभ रंग- मोतिया )

नोकरी धंद्यात काही मनाविरुद्ध घटना घडल्याने तुम्हाला नैराश्य येऊ शकते, पण हातचे सोडून पळत्याच्या मागे धावायचा मोह टाळा. ज्येष्ठांना उपासनेची चांगली प्रचिती येईल.

कुंभ (शुभ रंग – चंदेरी )

आज उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने प्रतिकूल दिवस. मोठे आर्थिक व्यवहार उदयावरच ढकला. ज्येष्ठ मंडळींना आज सत्संगातून मनःशांती मिळेल. आज कोणतेही धाडस नको.

मीन -(शुभ रंग – तांबडा )

सगळी महत्त्वाची कामे दिवसाच्या पूर्वार्धात उरकलेली बरी. भागीदारीच्या व्यवहारात पारदर्शकता ठेवा. आज संध्याकाळी जोडीदारास वेळ देणे हिताचे राहील.

शुभम भवतु 
श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क -9689165424

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.