Today’s Horoscope 30 October 2020: जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसीन्यूज ​- आजचे पंचांगवार शुक्रवार. … 30 ऑक्टोबर 2020

 

  • शुभाशुभ विचार — १८.०० पर्यंत चांगला दिवस.
  • आज विशेष — कोजागरी पौर्णिमा.
  • राहू काळ – सकाळी १०.३० ते १२.००.
  • दिशा शूल -पश्चिमेस असेल.
  • आजचे नक्षत्र – रेवती दुपारी १४.५७ पर्यंत नंतर अश्विनी.
  • चंद्र राशी – मीन १४.५७ पर्यंत नंतर मेष.

 

आजचे राशीभविष्य

मेष  ( शुभ रंग – जांभळा)

नवीन उपक्रमांची सुरुवात उद्यावरच ढकललेली बरी. आज काही अत्यावश्यक देणी चुकवावी लागणार आहेत. एखादी हरवलेली वस्तू दुपारनंतर सापडण्याची शक्यता आहे.

वृषभ ( शुभ रंग- पिस्ता )

योग्य वेळी घेतलेल्या निर्णयांचे चीज होईल. व्यवसायात आवक मनाजोगती असेल. संध्याकाळी प्रिय मित्रांच्या सहवासात जुन्या आठवणींना उजाळा द्याल.

मिथुन   ( शुभ रंग- डाळिंबी)

अधिकारी वर्गाचे दडपण जाणवेल आज नाकासमोर चालणेच हिताचे राहील. बेकायदेशीर कृत्येअंगाशी येऊ शकतात मित्रांच्या फार नादी लागू नका.

कर्क  (शुभ रंग- मोरपिशी)

वाढत्या जबाबदाऱ्यांचे दडपण येईल. आज महत्त्वाचे निर्णय घेताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्यावा लागेल. आजी-आजोबा नातवंडात रमतील.

 

सिंह   ( शुभ रंग- गुलाबी)

भागीदारी व्यवसायात तीव्र स्वरूपाचे मतभेद होऊ शकतात. देण्याघेण्याचे व्यवहार चोख असावेत.  नोकरीच्या ठिकाणी प्रलोभनांना बळी पडू नये.

_MPC_DIR_MPU_II

कन्या ( शुभ रंग- सोनेरी)

कष्टाच्या प्रमाणात मोबदला कमी असेल. आज काही कामे निस्वार्थीपणे कराल. काही नवीन शिकण्याची संधी मिळेल. वैवाहिक जीवनात दुपारनंतर सुसंवाद राहील.

तूळ  –  ( शुभ रंग- चंदेरी)

आज तुम्हाला एखादी गुप्त बातमी समजेल. गृहिणींनी झाकली मूठ झाकली ठेवणे गरजेचे आहे. मुले आज आज्ञाधारक पणे वागतील

वृश्चिक   ( शुभ रंग- क्रीम)

सामाजिक कार्यात मान-सन्मान वाढेल. कुटुंबियांना अभिमानास्पद वाटेल अशी कामगिरी आज कराल. ज्येष्ठ मंडळींना गुडघेदुखी हैराण करेल. अति दगदग टाळा

धनु   ( शुभ रंग- राखाडी)

आज तुमचे मन काहीसे चंचल राहील. काम कमी व धावपळ जास्त होईल. हातचे सोडून मृगजळामागे धाऊ नका. दम्याचे विकार असतील तर ज्येष्ठांनी काळजी घ्यावी.

 

मकर  – ( शुभ रंग- मोतिया)

आवक पुरेशी असली तरी खर्च करताना जपूनच करा. संध्याकाळी एखादा मोठा खर्च उद्भवणार आहे. आज तुम्हाला एखाद्या कामासाठी शेजाऱ्यांची मदत घ्यावी लागेल

कुंभ  – ( शुभ रंग- गुलाबी)

राशीच्या धनस्थानातून भ्रमण करणारा चंद्र अनपेक्षित पैसा मिळवून देईल. संध्याकाळी पैशाला वाटाही फुटतील. विद्यार्थ्यांना यश वाटते तितके सोपे नाही.

 

मीन   ( शुभ रंग – आकाशी)

व्यवसायातील वाढती स्पर्धा तुम्हाला बेचैन करेल. कौटुंबिक वाढत्या गरजांमुळे जमाखर्चाचा तराजू डळमळीत होईल. हौस मौज करण्यावर थोड्या मर्यादा घालणे गरजेचे आहे.

 

!! शुभं भवतु!!

 

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1