Todays Horoscope 30 September 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

आजचे पंचांगवारगुरुवार, दि.30.09.2021

  • शुभाशुभ विचार – उत्तम दिवस.
  • आज विशेष – नवमी श्राद्ध.
  •  राहू काळ – दुपारी 01.30  ते 03.00.
  • दिशा शूल – दक्षिणेस असेल.
  • आजचे नक्षत्र – पुनर्वसु.
  • चंद्र राशी –  मिथुन 19.05 पर्यंत नंतर कर्क.
—————————————

आजचे राशीभविष्य

मेष ( शुभ रंग- पिस्ता)

आज तुमच्यासाठी गृहसौख्याचा दिवस आहे. कुठेही न जाता घरीच आराम करावा असा तुमचा मूड असेल. मुलांची अभ्यासातील प्रगती पाहून तुम्ही आज समाधानी व्हाल.

वृषभ (शुभ रंग- डाळिंबी)

आज तुम्हाला मुलांच्या काही शैक्षणिक समस्या भेडसावतील. साहित्यिक मंडळींकडून दर्जेदार लिखाण होईल. कार्यालयीन कामानिमित्त प्रवास होणार आहे.

मिथुन- ( शुभ रंग- निळा)

नोकरीच्या ठिकाणी आज वरिष्ठांचे उत्तम सहकार्य राहिल. नेहमीच्या कामा व्यतिरिक्त एखादी अतिरिक्त जबाबदारी स्वीकारावी लागेल. आज आवक समाधानकारक असेल.

कर्क ( शुभ रंग- हिरवा)

आज कुठेही आपलीच मर्जी चालावी असा तुमचा हट्ट राहील. प्रतिष्ठा सांभाळण्यासाठी पैसाही खर्च कराल. आपल्या सडेतोड बोलण्याने कुणाच्या तरी भावना दुखावतील.

सिंह (शुभ रंग -आकाशी)

ज्येष्ठांनी प्रकृतीची अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे. काही आरोग्यविषयक चाचण्या करून घ्याव्या लागतील. अनावश्यक खर्चाचे प्रमाण वाढणार आहे.

कन्या ( शुभ रंग- सोनेरी)

नवविवाहितांची स्वप्ने साकार होतील. व्यवसायातील उलाढाल वाढेल. सामाजिक जीवनातली प्रतिष्ठा वाढेल. दिवसाच्या उत्तरार्धात एखादा अनपेक्षित लाभ संभवतो.

तूळ – (शुभ रंग- पांढरा)

नोकरीत आज वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागणार आहे. विरोधकांनाही आज चहा पाजून आपलेसे करावे लागेल. अहंकारास लगाम द्या. थोडे वाका पण मोडू नका.

वृश्चिक ( शुभ रंग -जांभळा)

आत्मविश्‍वासाने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. क्षुल्लक कारणाने कारणाने घरातील मोठ्यांशी मतभेद संभवतात. जे काय करायचे ते मिटल्या तोंडी करा.

धनु (शुभ रंग -मोरपंखी)

कुठलीही गोष्ट आज सहजसाध्य नसुन अथक परिश्रम गरजेचे आहेत. नवीन ओळखीत आर्थिक व्यवहार नको. वैवाहिक जीवनात आज जोडीदारास फार प्रश्न विचारू नका.

मकर (शुभ रंग- गुलाबी)

कार्यक्षेत्रात उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अथक प्रयत्ना शिवाय दुसरा पर्याय नाही. बेरोजगारांची वणवण संपून त्यांना रोजगार मिळेल. काही येणी असतील तर मागितल्याशिवाय मिळणार नाहीत.

कुंभ –( शुभ रंग-मोतिया)

अधिकारी वर्गास कामगारांच्या प्रश्‍नात लक्ष घालावे लागणार आहे. आज घरा बाहेर वावरताना रागीट स्वभाव काबूत ठेवा. संध्याकाळी कदाचित डॉक्टरांची भेट द्यावी लागेल.

मीन – (शुभ रंग-चंदेरी)

एखाद्या सामाजिक कार्यात आज पुढाकार घ्याल. गृहिणींना एखाद्या समारंभात मनासारखा मानपान मिळेल. कलाकारांना उत्तम संधी मिळतील.आज प्रेम प्रकरणे फुलतील बहरतील.

!! शुभम भवतु!!

श्री जयंत कुलकर्णी

फोन ९६८९१६५४२४

( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.