Today’s Horoscope 30 September 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 30 September 2022

 वार – शुक्रवार.

तारीख 30-09-22

शुभाशुभ विचार- उत्तम दिवस.

आज विशेष – ललिता पंचमी.

राहू काळ – सकाळी 10.30 ते 12.00

दिशा शूल- पश्चिमेस असेल.

आजचे नक्षत्र- अनुराधा.

चंद्र राशी-  वृश्चिक.

————————————–

आजचे राशिभविष्य

मेष – शुभ रंग- मरून

कामाच्या ठिकाणी विरोधक चुका काढण्यासाठी टपूनच बसलेले आहेत. वरिष्ठांचे काही केले तरी समाधान होणे शक्य नाही. आज संध्याकाळी सत्संगाकडे पावले आपोआप वळतील.

वृषभ- शुभ रंग- तांबडा

केवळ मोठेपणासाठी आज न झोपणाऱ्या जबाबदारी स्वीकारू नका. जोडीदाराच्या भावना जपण्याचा प्रयत्न करा. आज तुम्हाला थोडी विश्रांतीची गरज असेल.

मिथुन- शुभ रंग- हिरवा

आज काही आरोग्याच्या तक्रारी तुम्हाला त्रस्त करतील. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. आज वैवाहिक जीवनात काही सौम्य मतभेद असतीलच. शब्द जपून वापरा.

कर्क- शुभ रंग- लाल

दुकानदारांची उधारी वसूल होईल आजारी व्यक्तींच्या प्रकृतीत चांगलीच सुधारणा दिसून येईल. वैवाहिक जीवनात काही जुन्या आठवणी मनाला आनंद देतील.

सिंह -शुभ रंग- डाळिंबी

हौशी मंडळी आज जीवाची मुंबई करण्यासाठी पैसा खर्च करतील. आज गृहिणी घर सजावटीवर भर देतील. कलाकारांना प्रयत्न वाढवावे लागणार आहेत.

कन्या- शुभ रंग- क्रीम

वस्तू व वाहन खरेदी विक्रीचे व्यवहार आज टाळले तर बरे होईल दोन्हींना आज माहेरीची ओढ लागेल विद्यार्थी आज अभ्यासापेक्षा खेळातच जास्त रमतील.

तूळ- शुभरंग- पिस्ता

आज तुम्ही गोड बोलून विरोधकांची ही मने जिंकाल. एखाद्या कामासाठी आज तुम्हाला शेजाऱ्यांच्या मदतीची गरज लागेल. क्षुल्लक कारणाने दुरावलेले मित्र आज जवळ येतील.

वृश्चिक- शुभ रंग- स्ट्रॉबेरी

आज तुम्ही आपल्याच मनाप्रमाणे वागाल. थोडी अहंकाराची बाधा होईल. अति स्पष्ट बोलल्याने तुमचेच काही हितचिंतक दुरावण्याची शक्यता आहे. आज कुणालाही मोफत सल्ले वाटप करू नका.

धनु- शुभ रंग-केशरी

काही जणांना आज तातडीचे प्रवास घडण्याची शक्यता आहे. घरात थोरांच्या शब्दास मान द्यावा लागेल. एखादी हरवलेली वस्तू दुपारनंतर परत शोधा म्हणजे सापडेल.

मकर- शुभरंग- निळा

कार्यक्षेत्रात प्रगतीचा आलेख उंचावेल आर्थिक बाजू भक्कम असल्याने आज थोडी अनावश्यक खरेदी कराल. लांबच्या प्रवासात बेसावध राहू नका.

कुंभ- शुभरंग- आकाशी

आळस झटकून कामाला लागाल. पण अति उत्साहात आज काही चुकीचे निर्णय घ्याल. हाती असलेला पैसा जपून वापरा भावनेच्या भरात कोणालाही शब्द देऊ नका.

मीन- शुभरंग- राखाडी

कार्यक्षेत्रात ध्येयप्राप्तीसाठी अथक परिश्रम करण्याची तुमची तयारी असेल. आज आपल्याच काही जुन्या तत्त्वांना मुरड घालावी लागेल. महत्त्वाच्या चर्चेत सुसंवाद साधा.

 

 

      शुभम भवतु

श्री जयंत बाळकृष्ण कुलकर्णी

( ज्योतिष व वास्तु सल्लागार)

फोन 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.