Today’s Horoscope 31 December 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – वार – शनिवार. 31 डिसेंबर 2022 Today’s Horoscope 31 December 2022
  • शुभाशुभ विचार- चांगला दिवस.
  • आज विशेष- साधारण दिवस.
  • राहू काळ – सकाळी 9.00 ते 10.30 
  • दिशा शूल – पूर्वेस असेल.
  • आजचे नक्षत्र – रेवती 11.47 पर्यंत नंतर अश्विनी. 
  • चंद्र राशी – मीन 11.47 पर्यंत नंतर मेष.

—————————————-

मेष – (शुभ रंग- डाळिंबी)

कुठेही आपलेच खरे करण्याचा आज तुमचा प्रयत्न असेल. काही किरकोळ गोष्टी वरूनही तुमचा राग अनावर होईल. महत्त्वाच्या चर्चेमध्ये आपले मत मांडण्याची घाई करू नका. इतरांचेही ऐकून घ्या.

वृषभ (शुभ रंग- केशरी)

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना घरापासून लांब रोजगार मिळेल. अधिकारी वर्गास ऑफिसच्या कामासाठी प्रवासास निघावे लागेल. दुकानदारांनी आज रोख उद्या उधार असा बोर्ड लावावा.

New Year Photography Contest : नववर्षाच्या स्वागताचा फोटो क्लिक करा आणि जिंका चांदीची आकर्षक भेटवस्तू!

मिथुन (शुभ रंग- गुलाबी)

अत्यंत आनंदी व उत्साही असा आजचा दिवस असून आज काही दुरावलेली नाती जवळ येतील. काही भाग्यवान मंडळींना नवीन घराचा ताबा आज मिळू शकेल. तुमची अपुरी स्वप्न साकार होतील.

कर्क (शुभ रंग- जांभळा) Today’s Horoscope 31 December 2022

आज तुम्ही रिकामटेकड्या चर्चेपेक्षा फक्त कृतीस प्राधान्य देणे गरजेचे आहे. नोकरदारांना वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल. मित्रमंडळींना आज दोन हात दूरच ठेवा.

सिंह (शुभ रंग- पिस्ता)

नोकरदारांनी नोकरीच्या ठिकाणी असलेले नियम तंतोतंत पाळावेत. वरिष्ठांना खूश करण्यासाठी आज तारेवरची कसरत करावी लागणार आहे. ज्येष्ठांना मनःशांतीसाठी सत्संगाकडे वळावेच लागेल.

कन्या (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

आज आपल्या कुवती बाहेर मोठ्या आर्थिक उलाढाली न केलेल्या बऱ्या. सासुरवाडीकडून एखादा लाभ पदरात पडू शकतो. वैवाहिक जीवनातले वाद फार ताणू नका. जोडीदाराच्या हो ला हो करून विषय संपवा.

तूळ (शुभ रंग- भगवा)

भागीदारीच्या व्यवसायात देण्या-घेण्याचे व्यवहार चोख ठेवा. वैवाहिक जीवनात आज जुन्या फोटोंचा अल्बम चाळणे हिताचे राहील. दूरच्या प्रवासात काही वेळ खोळंबा संभवतो.

वृश्चिक (शुभ रंग- चंदेरी) Today’s Horoscope 31 December 2022

ध्येयप्राप्तीसाठी तुमचे अथक परिश्रम चालू असून तब्येतीकडे मात्र तुमचे दुर्लक्ष होत आहे. आज तुम्हाला विश्रांतीची नितांत आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धेत हमखास यश मिळू शकेल.

New Year Photography Contest : नववर्षाच्या स्वागताचा फोटो क्लिक करा आणि जिंका चांदीची आकर्षक भेटवस्तू!

धनु- (शुभ रंग- पांढरा)

उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या महत्वाकांक्षा वाढतील. मुले पालकांच्या अपेक्षा पूर्ण करतील आज सहकुटुंब एखाद्या मनोरंजनाच्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्याल. छान दिवस.

मकर (शुभ रंग- आकाशी)

आज तुमच्यासाठी गृहसौख्याचा दिवस असून कुठेही न जाता घरी आराम करावासा वाटेल. गृहिणी आज घर स्वच्छतेचे मनावर घेतील. मुलांच्या शिस्तीसही प्राधान्य द्यायला हवे.

कुंभ (शुभ रंग – निळा) Today’s Horoscope 31 December 2022

शेतीवाडी व स्थावर मालमत्तेचे मोठे व्यवहार आज टाळा. प्रवासात काही नवीन नाती जुळतील. आज काही अतिहुशार मंडळी ही संपर्कात येणार आहेत. डोके शांत ठेवणे गरजेचे आहे.

मीन -(शुभ रंग – पांढरा)

आज तुमची आर्थिक बाजू भक्कम असेल. गोड बोलून विरोधकांनाही तुम्ही आज आपलेसे कराल. नेत्यांची वक्तव्ये जनमानसांवर प्रभाव टाकतील आज आशादायी दिवस.

शुभम भवतु

– जयंत कुलकर्णी

ज्योतिष व वास्तु सल्लागार

संपर्क – 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.