Today’s Horoscope 31 July 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग  वार – शनिवार दि. 31 जुलै 2021                         

  • शुभाशुभ विचार – सामान्य दिवस.
  • आज विशेष – कालाष्टमी.
  • राहू काळ – सकाळी 09.00 ते 10.30.
  • दिशा शूल – पूर्वेस असेल.
  • आजचे नक्षत्र – अश्विनी 16.38 पर्यंत नंतर भरणी.
  • नक्षत्र पाया- सुवर्ण.
  • चंद्र राशी – मेष.

—————————————

मेष – ( शुभ रंग -मोतिया )

आज तुमच्या कामातील उरक चांगला राहील. तब्येत ठणठणीत असेल. मुले आज मनापासून अभ्यास करतील. वैवाहिक जीवनात गोडीगुलाबी राहील.

वृषभ – ( शुभ रंग -सोनेरी )

आज जमा खर्चाचा मेळ बसवताना तुमच्या नाकीनऊ येणार आहेत. विदेशाशी संबंधित व्यवसाय चांगले चालतील. जवळच्या मित्रांमध्येच काहीतरी मतभेद होतील

मिथुन – ( शुभ रंग -केशरी )

जीवाची मुंबई करण्यासाठी हाती पुरेसा पैसा असेल. मित्र तुमच्या शब्दास मान देतील. उच्चशिक्षित असाल तर मनासारख्या नोकऱ्यांचे प्रस्ताव येतील. आज एखादा अनपेक्षित लाभ संभवतो.

कर्क – ( शुभ रंग- हिरवा )

वाणीत गोडवा ठेवलात तर अनेक किचकट कामे सोपी होतील. आज पैशाची कमतरता भासणार नाही. नोकरदारांना वरिष्ठांच्या अपेक्षा पूर्ण करताना नाकी नऊ येतील.

सिंह – ( शुभ रंग- मरून )

कार्यक्षेत्रात काही मनाविरुद्ध घटना घडल्याने नैराश्य येईल. नोकरदारांनी आज वरिष्ठांना गुड मॉर्निंग करणे हिताचे राहील. सहकाऱ्यांशी जुळवून घ्यावे लागेल. ज्येष्ठांना सत्संगातूनच मन शांती मिळेल.

कन्या – ( शुभ रंग – पिस्ता)

तरुणांनी कुसंगती पासून लांबच रहावे. नीती बाह्य वर्तन अंगाशी येईल. वाहन चालवताना शिस्त पाळणे गरजेचे आहे. शेअर मार्केट मध्ये आज तरी कोणतीही रिस्क घेऊ नका.

तुळ – ( शुभ रंग- क्रीम)

आज काही मनासारख्या घटनांनी तुमची उमेद वाढेल. गृहिणींना आवडत्या छंदातून धनप्राप्ती होईल  वैवाहिक जीवनात लाडिक रुसवे-फुगवे असतीलच.

वृश्चिक – (शुभ रंग- मोरपंखी)

काही जुन्या आरोग्याच्या तक्रारी पुन्हा उद्भवतील. डॉक्टरांनी दिलेल्या सूचना तंतोतंत पाळणे हिताचे राहील. नोकरीच्या ठिकाणी फक्त स्वतःचे काम करुन मोकळे व्हा. फार   खोलात शिरून नका.

धनु – (शुभ रंग- केशरी)

महत्वाच्या कामास विलंब होईल. बेरोजगारांची भ्रमंती चालूच राहील. रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा दिसेल.

आज सहकुटुंब एखाद्या मॉल मध्ये फेरफटका माराल. काही अनावश्यक खरेदी होईल.

मकर – (शुभ रंग- जांभळा)

कार्यक्षेत्रात पूर्वीच्या अथक परिश्रमांचे फळ दृष्टिक्षेपात येईल. कला क्रीडा क्षेत्रातील मंडळींनी प्रयत्न वाढवायला हवेत. गृहिणींना अनपेक्षित पाहुण्यांची ऊठबस करावी लागेल.

कुंभ – (शुभ रंग- चंदेरी)

परिवारातील सदस्यांच्या गरजा वाढतच राहणार आहेत. आज मोठ्या आर्थिक व्यवहारात सावध राहणे गरजेचे आहे. वाहनचालकांना बेशिस्त वागणुकीचा दंड भरावा लागेल.

मीन – ( शुभ रंग- गुलाबी)

आज अपेक्षितपणे काही रक्कम हाती येण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे खर्चाचेही विविध मार्ग खुणावतील. गृहिणींना अनेक जाहिराती भुरळ घालतील.

!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी. 
फोन- ९६८९१६५४२४.
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार )

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.