Todays Horoscope 31 May 2022 : जाणून घ्या आजचे राशीफळ

आजचे पंचांग – वार मंगळवार, दि. 31.05.2022

  • शुभाशुभ विचार — करिदिन.
  • आज विशेष – करिदिन वर्ज्य दिवस.
  • राहू काळ – दुपारी 03.00 ते 4.30.
  • दिशा शूल – उत्तरेस असेल.
  • आजचे नक्षत्र – रोहिणी 10.01 पर्यंत नंतर मृग.
  • चंद्र राशी –  23.30 पर्यंत वृषभ, नंतर मिथुन.

_________________________

आजचे राशीभविष्य-

मेष – ( शुभ रंग- पांढरा )

सकाळी पैशांनी भरलेले खिसे आज दुपारनंतर रिकामे होण्याची शक्यता आहे. अनावश्यक खर्चाला आवर घालायला हवा. कार्यक्षेत्रात प्रामाणिकपणाच  कामी येईल प्रलोभने टाळा.

वृषभ – ( शुभ रंग- आकाशी)

आज दुपारनंतर अनपेक्षितपणे काही रक्कम हाती येईल. भावंडात काही व्यावहारिक मतभेद होण्याची शक्यता आहे. पण यावर सुसंवादाने मार्ग निघेल. मात्र तडजोड कराविच लागेल.

मिथुन- ( शुभरंग- मोरपंखी)

काल पासून एखादी वस्तू हरवली असेल तर ती आज परत शोधा, दुपारनंतर ती सापडू शकेल. घरातील थोर मंडळी आज सामंजस्याने वागतील. मुलांच्या तब्येतीची काळजी घ्या.

कर्क-( शुभ रंग – डाळिंबी)

उद्योग व्यवसायात आज मनाजोगती धनप्राप्ती होईल. काही नवीन हितसंबंध तयार होतील. मित्र आज दिलेली आश्वासने पळतील. नाती सांभाळायची असतील तर फार खोलात न शिरता गोड गोड बोला.

सिंह – ( शुभ रंग- पिस्ता)

आज हौस मौज करण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध होईल. मित्र-मैत्रिणींच्या सहवासात आजची संध्याकाळ मजेत जाईल. तरुणांनी व्यसनांपासून लांब राहावे.

कन्या-( शुभ रंग – सोनेरी)

व्यवसायात मोठ्या आर्थिक उलाढाली करताना भागीदारांना विश्वासात घ्या. रखडलेली शासकीय कामे दुपारनंतर गती घेतील. ज्येष्ठ मंडळींनी हाती असलेला पैसा जपून वापरावा.

तूळ – (शुभ रंग – चंदेरी)

आज मनाच्या द्विधा अवस्थेत कोणतेही निर्णय घेण्याची घाई करू नका. विरोधकांना व स्पर्धकांनाही कमजोर समजू नका. घरात वडीलधार्‍या मंडळींच्या हो ला हो करून विषय संपवलेला बरा.

वृश्चिक- ( शुभ रंग- केशरी)

वैवाहिक जीवनात एकमत असून आज जोडीदाराकडे मन मोकळे करावेसे वाटेल. आज धाडसाची कामे टाळा. कायदा मोडण्याचा विचारही करू नका.

धनु – ( शुभ रंग – चंदेरी)

केवळ मोठेपणासाठी आज न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारू नका. मागून नावे ठेवणार्‍या मंडळींकडे दुर्लक्ष करा. वैवाहिक जीवनात संध्याकाळी जुन्या आठवणी ताज्या कराल.

मकर- (  शुभ रंग- क्रीम)

काही खोटी स्तुती करणारी माणसे भेटतील, सतर्क राहा. आज फक्त आपला स्वार्थ बघा. मित्रांना पार्टी आज नको. एखादा जुना आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे.

कुंभ – (शुभ रंग- स्ट्रॉबेरी )

आज तुम्ही आनंदी व प्रसन्नचित्त असाल. बर्‍याचशा गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतील. आशादायी दिवस असून आज विरोधकही मैत्रीचा हात पुढे करतील.

मीन – ( शुभ रंग – मरून )

आज रिकामटेकड्या गप्पांपेक्षा कृतीस प्राधान्य दिले तर बरे होईल. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी भटकंती करावी लागेल. ऑफिस मधील महत्त्वाचे दस्तऐवज सांभाळा.

!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी.
फोन – ९६८९१६५४२४
( ज्योतिषी आणि वास्तू सल्लागार)

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.