Today’s Horoscope 31 May 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 31 May 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – बुधवार

31.05. 2023.

शुभाशुभ विचार- व्यातीपत वर्ज्य दिवस.

आज विशेष- निर्जला एकादशी.

राहू काळ – दुपारी 12.00 ते  1.30.

दिशा शूल – उत्तरेस असेल.

आजचे नक्षत्र – हस्त 6.00 पर्यंत नंतर चित्रा.

चंद्र राशी – कन्या 18.30 पर्यंत नंतर तूळ.

—————————————-

मेष – ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी )

कला क्षेत्रातील मंडळींना वाढत्या स्पर्धेचा सामना करावा लागेल. आरोग्याच्या काही तक्रारी त्रस्त करतील. आज संध्याकाळी डॉक्टरांच्या भेटीचा योग दिसतो आहे.

वृषभ (शुभ रंग- पांढरा )

आज कुटुंबियांच्या वाढत्या मागण्या पुरवाव्या लागतील. विद्यार्थी आज उत्कृष्ट कामगिरी करतील. गृहिणींना अचानक येणाऱ्या पाहुण्यांची उठबस करावी लागणार आहे.

मिथुन ( शुभ रंग- सोनेरी )

सामाजिक कार्यकर्ते लोकांच्या आदरास पात्र होतील. आज तुम्ही गरजूस आवर्जून मदत कराल. इतरांची मने सांभाळाल. आज काही शुभ समाचार येणार आहे.

कर्क (शुभ रंग- आकाशी )

आवक पुरेशी असल्याने आज मनासारखा खर्च कराल. क्षुल्लक कारणावरून शेजारी रुसून बसतील. आज अति स्पष्ट वक्तेपणामुळे तुमचे काही हितचिंतक दुरावतील.

सिंह (शुभ रंग- हिरवा )

आज तुम्ही काहीसे लहरीपणाने वागाल कुणाचेही ऐकून घ्यायची तुमची तयारीच नसेल. उतावीळ पणाने घेतलेले आज काही निर्णय चुकतील. हातचे सोडून पळत्या मागे धावावेसे वाटेल पण तसे करू नका.

कन्या ( शुभ रंग- पिस्ता )

एखादी हरवलेली वस्तू गवसेल. आज तुम्ही स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासावर भर द्याल. नवी वस्त्र खरेदी होईल. घरात थोरामोठ्यांच्या होला हो करा वाद वाढवू नका.

तूळ ( शुभ रंग- गुलाबी )

आज महत्त्वाच्या कामासाठी भटकंती होईल. अनावश्यक खर्चाचे प्रमाण वाढेल. अधिकारी वर्गास विदेश दौरे घडतील. हातचे सोडून मृगजला मागे धावणार आहात.

वृश्चिक (शुभ रंग- निळा)

नोकरीच्या ठिकाणी आज वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. नव्या व्यावसायिकांचे कर्ज प्रस्ताव मंजूर होतील. कामाच्या व्यापात घरगुती समस्यांकडे तुमचे दुर्लक्ष होईल.

धनु- (शुभ रंग- राखाडी)

काही मनाविरुद्ध घडलेल्या घटनांनी तुम्हाला नैराश्य येईल. कार्यक्षेत्रात नवे उपक्रम सुरू करण्यासाठी आज दिवस योग्य नाही. वैवाहिक जीवनात काही सौम्य मतभेद चालायचेच.

मकर ( शुभ रंग- क्रीम )

आज तुमचा आध्यात्मिक मार्गाकडे ओढा असेल. काही नास्तिक मंडळीही देवाला एखादा नवस बोलतील. घरात एखादे धार्मिक कार्य करण्याचे बेत योजाल. दैवाची साथ राहील.

कुंभ (शुभ रंग – चंदेरी )

व्यवसायातील वाढत्या स्पर्धेने आज व्यावसायिक त्रस्त असतील. आज अडचणीच्या प्रसंगी पत्नीची मात्र खंबीर साथ राहील. कुटुंबास पुरेसा वेळ द्यायचा तुमचा प्रयत्न असेल.

मीन -(शुभ रंग – तांबडा )

धंद्यातील येणी वसूल होतील गोड बोलून आज तुम्ही आपल्या विरोधकांनाही आपलेसे कराल. जुनी दुखणी अंगावर काढू नका आज तुम्हाला विश्रांतीही गरजेची आहे.

शुभम भवतु 

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क-9689165424.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.