Today’s Horoscope 04 December 2022- जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – Today’s Horoscope 04 December 2022

वार – रविवार

04-12-22

 शुभाशुभ विचार- उत्तम दिवस.

 आज विशेष- भागवत एकादशी.

राहू काळ – सकाळी 4.30 ते 6.00

दिशा शूल* – पश्चिमेस असेल.

आजचे नक्षत्र – रेवती 6.16 पर्यंत नंतर अश्विनी.

चंद्र राशी – मीन 6.16 पर्यंत नंतर मेष.

—————————————-

मेष – ( शुभ रंग- नारंगी )

आज तुमची तब्येत काहीशी नरमच असेल मन हळवे करणाऱ्या एखादा प्रसंग घडेल तुम्ही जशास तसे या धोरणाने वागा फार टेन्शन घेऊ नका आणि क्षुल्लक गोष्ट फार मनाला लावून घेऊ नका.

वृषभ (शुभ रंग- पिस्ता )

अत्यावश्यक देणी आज चुकावावी लागणार आहेत. दूरच्या प्रवासात आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. कठोर बोलण्याने तुमचेच काही हितचिंतक दुखावली जाण्याची शक्यता आहे.

मिथुन ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी )

जसे चिंताल तसेच होईल. आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस असून तुमची काही अपुरे स्वप्न साकार होऊ शकतील. आज व्यावसायिकांचे कर्ज प्रस्ताव मंजूर होतील. आशादायी दिवस.

कर्क (शुभ रंग- केशरी)

उद्योग धंद्याच्या दृष्टीने आज अनुकूल दिवस असून नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य राहील अधिकार योग चालून येतील हाताखालच्या लोकांवर तुमचा वचक राहील.

सिंह (शुभ रंग- चंदेरी )

आज अति उतावीळपणे घेतलेले निर्णय चुकतील. महत्त्वाच्या घरगुती प्रश्नात वडीलधाऱ्याचे मत घेणे गरजेचे आहे. आज वाहतुकीचे नियम मोडू नका दंड चुकणार नाही.

कन्या ( शुभ रंग- हिरवा)

नवीनच झालेल्या ओळखीत लगेच विश्वास टाकून फसू नका. आज जिवलग मित्र ही दगा देऊ शकतात. कार्यक्षेत्रात ही सावधगिरीने पावले टाकणे गरजेचे आहे. गाडी चालवताना सतर्क रहा.

तूळ ( शुभ रंग- राखाडी)

व्यवसायात वाढत्या स्पर्धेचा सामना करण्यासाठी सज्ज असाल. वादविवादात आपली समते इतरांवर लाजू शकाल आज वैवाहिक जीवनात गोडी गुलाबी राहील.

वृश्चिक (शुभ रंग- क्रीम)

काही जुने आजार आज डोके वर काढण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ मंडळींना काही आरोग्य विषयक चाचण्या करून घ्याव्या लागतील. विद्यार्थ्यांना स्पर्धेत हमखास यश मिळेल.

धनु- (शुभ रंग- लाल)

आज उच्च राहणी व उच्च विचारसरणी असे तुमचे धोरण असेल आपल्या व्यक्तिमत्व विकासावर भर द्याल गृहिणी आज पार्लर साठी आवर्जून वेळ काढतील आज सहकुटुंब चैन कराल.

मकर ( शुभ रंग- पांढरा )

धंद्यातील येणी वसूल होतील. कार्यक्षेत्रात आज स्वतःचे महत्त्व सिद्ध करू शकाल. गोड बोलून आपला स्वार्थ साधून घेण्याची कला तुम्हाला चांगलीच जमेल.

कुंभ (शुभ रंग – मरून)

मोठे आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करावेत. आज काही अयोग्य मनसे संपर्कात येतील. कुणी केलेल्या खोट्या स्तुतीने भारावून जाऊ नका. कायद्याची चौकट मोडू नका.

मीन -(शुभ रंग – जांभळा )

सर्व कामे सुरळीत पार पडतील. व्यवसायात आवक मुबलक असली तरीही काही मोठे खर्चही हात जोडून उभे असतील. विरोधकही आज मैत्रीसाठी हात पुढे करतील.

 

 

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.