Today’s Horoscope 5 April 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग.  वार – सोमवार. 5 एप्रिल  2021

  • शुभाशुभ विचार — उत्तम दिवस.
  • आज विशेष – सामान्य दिवस.
  • राहू काळ – सकाळी 7.30 ते 9.00
  • दिशा शूल – पूर्वेस असेल.
  • आजचे नक्षत्र – उत्तराषाढा.
  • चंद्र राशी – सकाळी 08.02 पर्यंत धनु , नंतर मकर.

 

आजचे राशीभविष्य

मेष – ( शुभ रंग – सोनेरी)

कार्यक्षेत्रात स्वतःचे महत्त्व सिद्ध कराल. नोकरीत बढतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. व्यवसायात भिडस्तपणास लगाम घालावा लागेल. काही निर्णय झटपट घ्यावे लागतील. एकही संधी वाया घालवू नका.

वृषभ – ( शुभ रंग- राखाडी)

आज अति आक्रमकता नुकसानास कारणीभूत होईल. विरोधकांना चहा पाजूनच आपला कार्यभाग साधून घेणे हिताचे राहील. आज जरा युक्तीने वागा. अहंकारास सुट्टीच देणे हिताचे राहील.

मिथुन – ( शुभ रंग- डाळिंबी)

आज जोखमीची कामे टाळलेलीच बरी. जे काही कराल ते तब्येतीस जपूनच करा. हातचे सोडून पळत्याच्या मागे अजिबात धावू नका व कायद्याची चौकट मोडू नका.

कर्क – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी )

आज तुम्ही अगदी सहज घेतलेले निर्णय ही योग्यच ठरतील. व्यवसायातील स्पर्धकांना ही तुमचा हेवा वाटेल. आज बरेच दिवसापासून तुम्हाला अपेक्षित असलेल्या प्रिय व्यक्तीचा अचानक फोन येईल.

सिंह – ( शुभ रंग- गुलाबी )

कार्यक्षेत्रात सावधगिरीने पावले टाकणे गरजेचे आहे. नवीन ओळखीत डोळे झाकून विश्वास ठेवणे योग्य ठरणार नाही. आज ताकही फुंकून पिणे गरजेचे आहे.

कन्या – ( शुभ रंग पांढरा )

तरुणांनी मौज मजा करताना कायद्याचे भान ठेवावे. बेफिकीर पणास लगाम गरजेचा आहे. व्यसने घात करतील. कला क्षेत्रातील मंडळींना मेहनतीचे फळ मिळेल.

तूळ – ( शुभ रंग- पिस्ता)

आज स्थावर, शेतीवाडी संबंधित व्यवहार फायद्याचे ठरतील. कलाकारांना मात्र रिकाम्या खुर्च्या बघाव्या लागतील. कौटुंबिक वाढत्या जबाबदाऱ्या पूर्ण करताना गृहिणींना थकवा जाणवेल.

वृश्चिक – (शुभ रंग- मोरपिशी)

भावनेच्या भरात कोणाला वचने देऊ नका. कितीही चांगले संबंध असले तरी कुणाला जामीन राहू नका. आज लहान भावाला तुमच्या मदतीची गरज भासेल.

धनु – ( शुभ रंग- जांभळा)

रिकाम्या चर्चेतून वाद होतील. जोडीदार जे म्हणेल त्यास हो म्हणालात तर वैवाहिक जीवनात गोडीगुलाबी राहील. नवविवाहितांना बाळाच्या आगमनाची चाहूल लागेल.

मकर – ( शुभ रंग- नारिंगी)

आज प्रत्येक कामात विलंब ठरलेलाच आहे. व्यवसायात वाढत्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी कामाचे तास वाढवावे लागतील. आवडत्या क्षेत्रात नेतृत्व करण्याची संधी मिळेल. आज स्वतःचे लाड पुरवाल.

कुंभ – (शुभ रंग- मरून)

अनाठायी खर्चाचे प्रमाण वाढेल. प्रवासात दगदग होईल. बेरोजगारांनी घरापासून लांब जायची तयारी ठेवायला हवी. एखाद्या सुरक्षित आर्थिक गुंतवणुकीचा विचार कराल.

मीन  – ( शुभ रंग- चंदेरी)

आज आपला स्वार्थ साधून घेण्यासाठी मोठ्या लोकांच्या ओळखी वापराल. मित्रही आज दिलेले शब्द पाळतील. एखादी मोठी रक्कम हाती येण्याची शक्यता आहे.

 

!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.