Today’s Horoscope 5 August 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी न्यूज – आजचे पंचांग. गुरुवार 05 ऑगस्ट 2021

  • शुभाशुभ विचार – 17 पर्यंत चांगला दिवस.
  • आज विशेष – प्रदोष.
  • राहू काळ – दुपारी 01.30 ते 3.00.
  • दिशा शूल – दक्षिणेस असेल.
  • आजचे नक्षत्र – आर्द्रा.
  • नक्षत्र पाया – चांदी.
  • चंद्र राशी –  मिथुन.

_______________________

आजचे राशीभविष्य–

मेष – ( शुभ रंग- तांबडा)

आज घरा बाहेर वावरताना रागीट स्वभावावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. दैनंदिन कामात काही अडथळ्यांना तोंड द्यावे लागेल. एखाद्या कामात शेजाऱ्यांशी मदत घ्यावी लागेल.

वृषभ – ( शुभ रंग – मोतिया)

आज तुम्हाला पैशाची कमतरता अजिबात भासणार नाही. घराबाहेर तुमच्या वक्तृत्वाचा व कर्तुत्वाचा ही प्रभाव पडेल. आज भावनेच्या भरात कोणाला शब्द मात्र देऊ नका.

मिथुन – ( शुभ रंग – क्रीम)

योग्य माणसे संपर्कात येतील. मीपणा  सोडून व गोड बोलून स्वार्थ साधून घेणे गरजेचे. कुणालाही सल्ले देण्याच्या भानगडीत न पडता फक्त आपलं कसं चाललय तेवढेच बघा.

कर्क – ( शुभ रंग- पांढरा)

काही कारण नसताना आपले काम सोडून इतरांच्या भानगडीत डोकवाल. आज गरजूंच्या कमी याल. बेरोजगारांची भ्रमंती चालूच राहणार आहे. आज आपल्या डोळ्यांची काळजी घ्या.

सिंह – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस असून तुमच्या काही अपुऱ्या स्वप्नांची पूर्तता होणार आहे. कार्यक्षेत्रात तुम्ही केलेल्या कष्टांचे चीज होईल. विरोधक नमते घेतील.

कन्या – (शुभ रंग- हिरवा)

अधिकारांचा वापर जपून करा.अति स्पष्ट बोलण्याने तुमचे काही हितचिंतकच दुरावण्याची शक्यता आहे. मुलांच्या आरोग्यविषयक तक्रारींची वेळीच दखल घ्या.

तुळ – (शुभ रंग- जांभळा)

व्यवसायात जाहिरातबाजी वाढवावी लागणार आहे. अविश्रांत मेहनती नंतरच यशाची चाहूल लागेल. नवीन व्यावसायिकांनी आपली कुवत ओळखूनच आर्थिक उलाढाली कराव्यात.

वृश्चिक – (शुभ रंग- आकाशी)

आज चुकीच्या वर्तनाने प्रतिष्ठेची आणि होऊ शकेल वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या चुका काढू नका. विश्वासातील व्यक्तीकडूनही विश्वास घात होऊ शकतो सतर्क राहा.

धनु – (शुभ रंग- चंदेरी)

व्यवसायात भागीदरांशी सामंजस्य राहील. वैवाहिक जीवनात जुन्या फोटोंचा अल्बम चाळावसा वाटेल. इतरांच्या भांडणात आज यशस्वी मध्यस्थी कराल.

मकर – ( शुभ रंग- निळा)

नोकरदार मंडळींना आज वरिष्ठांच्या मागेपुढे करावेच लागेल. ज्येष्ठ मंडळींना आज डॉक्टरांच्या भेटीचे योग अटळ आहेत. व्यवसायात जुनी उधारी वसूल होईल. आज तब्येतीकडे दुर्लक्ष नको. विश्रांतीस प्राधान्य द्यावे.

कुंभ – ( शुभ रंग- भगवा )

तुमच्या कामातील उत्साह इतरांना प्रेरणा देईल. ज्येष्ठांना उत्तम प्रकृतीस्वास्थ्य लाभेल. तरुणाई आज जीवाची मुंबई करतील. प्रेम प्रकरणांना आज ग्रीन सिग्नल. नवोदित कलाकारांना ग्लॅमर मिळेल.

मीन – ( शुभ रंग- गुलाबी)

आज तुमचे मनोबल उत्तम असेल आवक पुरेशी राहील. तरीही बचतीला प्राधान्य देणे गरजेचे आहे गृहिणींना माहेरची ओढ लागेल. गृहसौख्याचा दिवस असून आज कुटुंबियांस पुरेसा वेळ द्याल.

!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी
फोन ९६८९१६५४२४
( ज्योतिषी व वास्तुशास्त्र सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.