Today’s Horoscope 5 September 2020: जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग, शुक्रवार दि​ . 5 ​​सप्टेंबर ​2020

शुभाशुभ…शुभ दिवस!
  • आज विशेष – संकष्ट चतुर्थी. चंद्र 20.56,  तृतीया श्राध्द.
  • राहूकाळ – सकाळी 09.00 ते 10.30
  • दिशा शूल – पूर्वेस असेल
  • नक्षत्र – रेवती 26.21 पर्यंत
  • आजची चंद्र राशि – मीन

आजचे राशीभविष्य

मेष –( शुभ रंग – पांढरा ) आज तुमच्यासाठी काही अत्यावश्यक खर्च हात जोडून उभे असतील. घरात थोर मंडळी आज आपलेच खरे करतील. आज तुम्ही जरा कमीच बोललेले बरे.

वृषभ – ( शुभ रंग – तांबडा ) व्यापार उद्योगाची मंदावलेली गती पूर्वपदावर येईल. काही अपुरे व्यवहार पूर्ण होतील. संततीचे विवाहयोग जुळून येतील. काही दुरावलेली नाती जवळ येतील.

मिथुन – ( शुभ रंग – पिस्ता ) कार्यक्षेत्रातील तुमचे वर्चस्व वाढेल नोकरीच्या ठिकाणी प्रमोशनची चाहूल लागेल अधिकारी वर्गाच्या अपेक्षा वाढतील. स्वप्नरंजन सोडून आज कृतीस प्राधान्य द्यावे लागेल.

कर्क – ( शुभ रंग – हिरवा ) कार्यक्षेत्रात काही अनपेक्षित अडचणींचा सामना करावा लागेल. वरिष्ठ आपल्यावर खुश आहेत अशा भ्रमात राहू नका. हाताखालच्या लोकात मिळून मिसळून राहा.

_MPC_DIR_MPU_II

सिंह – ( शुभ रंग – मरून )आज कुणाकडूनही सहकार्याची अपेक्षा करू नका. कार्यक्षेत्रात विरोधक सक्रिय आहेत. स्वावलंबनाने यश सोपे होईल. वाहन चालवताना गाणे गुणगुणू  नका.

कन्या – ( शुभ रंग – मोरपंखी) आज घराबाहेर तुमच्या आकर्षक व्यक्तीमत्वाचा चांगला प्रभाव पडेल. जोडीदारास अभिमानास्पद वाटणारी कामगिरी कराल. व्यावसायात स्पर्धकांना कमजोर समजू नये.

तूळ – ( शुभ रंग – आकाशी ) काही मानापमानाच्या प्रसंगाना तोंड द्यावे लागेल. तब्येत जरा नरम असल्याने संध्याकाळी डॉक्टरांच्या भेटीचे योग दिसतात. विरोधकांना चहा पाजून आपला स्वार्थ साधून घ्या.

वृश्चिक –( शुभरंग- स्ट्रॉबेरी ) नोकरदारांना आज काही कंटाळवाणी कामे करावी लागतील. नोकरीच्या ठिकाणी असलेले नियम तंतोतंत पाळा. हातचे सोडून पळत्याच्या मागे धावण्याचा मोह होईल.

धनु –( शुभ रंग – भगवा ) शैक्षणिक क्षेत्रांशी संबंधित काही व्यवसाय आज चांगले चालतील. विद्यार्थ्यांची अभ्यासातील प्रगती कौतुकास्पद राहील. खेळाडूंना सराव वाढवावा लागेल.

मकर – ( शुभ रंग – पिवळा) ऑफिस कामासाठी प्रवास करावा लागेल. घराबाहेर वावरताना डोके शांत ठेवा गृहिणींना आज अजिबात उसंत मिळणार नाही. अडचणीच्या प्रसंगी शेजारी धावून येतील.

कुंभ – ( शुभ रंग – जांभळा) आज तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम असल्याने तुमची मनस्थिती ही चांगली असेल  आज तुम्ही म्हणाल ती पूर्व असेल. शब्द हे शस्त्र आहे याचे मात्र आज भान ठेवा.

मीन –( शुभ रंग – गुलाबी ) आज तुमचा अहंकार वाढवणार्‍या काही घटना घडतील. महत्वाच्या चर्चेत इतरांचेही ऐकून घेण्याची मानसिकता ठेवा. ज्येष्ठ मंडळींना आज प्रकृती उत्तम साथ देईल.

श्री. जयंत कुलकर्णी
फोन. 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.