Today’s Horoscope 6 April 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

0

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग.  वार – मंगळवार, 6 एप्रिल  2021

  • शुभाशुभ विचार – १४ पर्यंत चांगला दिवस.
  • आज विशेष – सामान्य दिवस.
  • राहू काळ – दुपारी ०३.०० ते ०४.३०
  • दिशा शूल – उत्तरेस असेल.
  • आजचे नक्षत्र – श्रवण
  • नक्षत्र पाया – तांबे
  • चंद्र राशी – मकर.

 

आजचे राशीभविष्य

मेष – (शुभ रंग – डाळिंबी)
व्यावसायिक नवे करार यशस्वी होतील. एखाद्या नव्या उपक्रमाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे. भावना व कर्तव्य यांचा समन्वय साधणे कठीण जाईल.

वृषभ – (शुभ रंग – राखाडी)
नोकरीच्या ठिकाणी आपल्या कामाव्यतिरिक्त फार खोलात शिरू नका. वरिष्ठांना काही सुचवण्यासाठी आजचा दिवस योग्य नाही. अडचणी आज देवालाच सांगितलेल्या बऱ्या.

मिथुन – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
नवीनच झालेल्या ओळखीत लगेच विश्वास ठेवू नका. आज काही गोड बोली माणसे भेटतील झटपट लाभाचा मोह टाळणे हिताचे राहील. वैवाहिक जीवनात जोडीदार आपलेच खरे करेल.

कर्क – (शुभ रंग – सोनेरी)
आज सभा संमेलनात तुमच्या वक्तृत्वाचा प्रभाव पडेल. इतरांना योग्य सल्ले द्याल. जोडीदाराचे मन जपण्याचा प्रयत्न कराल. महत्त्वाच्या चर्चेत अग्रेसर राहाल. आनंदी दिवस.

सिंह – (शुभ रंग – पांढरा)
आज फक्त कष्ट करीत रहा, फळाची अपेक्षा मात्र उद्या करा. आज काही कंटाळवाणी कामे करावी लागणार आहेत. वैवाहिक जीवनात सकाळचे मतभेद संध्याकाळपर्यंत मिटतील.

_MPC_DIR_MPU_II

कन्या – (शुभ रंग – गुलाबी)
चंगळवादी व विलासी वृत्ती राहील. बऱ्याच दिवसांनी काही जुन्या मित्रांच्या सहवासात रमाल. पैसा उडवायचे अनेक मार्ग सुचतील. आज आरोग्य उत्तम राहील.

तूळ – (शुभ रंग – मोरपिशी)
कुटुंबात आज आर्थिक सुबत्ता नांदेल. गृहिणी घर सजावटीवर खर्च करतील. भावनेच्या भरात घेतलेले  निर्णय कदाचित चुकण्याची शक्यता आहे. आज प्रकृती स्वास्थ्य उत्तम राहील.

वृश्चिक – (शुभ रंग – पिस्ता)
व्यवसायात जाहिरातबाजी वाढवावी लागेल काही तत्त्वही गुंडाळून ठेवावी लागणार आहेत. आज काहीजणांचे घर मालकांशी मतभेद होतील. साहित्यिकांची लिखाणे प्रसिद्ध  होतील.

धनु – (शुभ रंग- नारिंगी)
सामाजिक कार्यकर्ते लोकांच्या आदरास पात्र होतील. वक्त्यांची भाषणे आज प्रभावी होतील. शेजारी आज कुत्सित नजरेने बघतील. आज संध्याकाळी एखाद्या घरगुती कार्यक्रमास हजेरी लावाल.

मकर – (शुभ रंग- नारिंगी)
सामाजिक कार्यकर्ते लोकांच्या आदरास पात्र होतील. वक्त्यांची भाषणे आज प्रभावी होतील. शेजारी आज कुत्सित नजरेने बघतील. आज संध्याकाळी एखाद्या घरगुती कार्यक्रमास हजेरी लावाल.

कुंभ – (शुभ रंग – चंदेरी)
अनावश्यक खर्चाचे प्रमाण वाढल्यामुळे जमाखर्चाचा तराजू डळमळीत होण्याची शक्यता आहे. आज कोणतीही रिस्क घेऊ नका कायद्याची चौकट मोडू नका.

.

मीन – (शुभ रंग – मरून)
वास्तू किंवा वाहन खरेदीसाठी केलेले कर्ज प्रस्ताव मंजूर होतील. विद्यार्थ्यांकडून कौतुकास्पद कामगिरी होईल. गैरसमजाने दुरावलेले नातलग जवळ येतील.

 

!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment