Today’s Horoscope 06 August 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी न्यूज – आजचे पंचांग. शुक्रवार 06 ऑगस्ट 2021

  • शुभाशुभ विचार – वर्ज्य दिवस.
  • आज विशेष — शिवरात्री.
  • राहू काळ – सकाळी १०.३० ते १२.००.
  • दिशा शूल – पश्चिमेस असेल.
  • आजचे नक्षत्र – आर्द्रा ०६.३७ पर्यंत, नंतर पुनर्वसु.
  • चंद्र राशी –  मिथुन.

_______________________

आजचे राशी भविष्य-

मेष- (शुभ रंग- मोतिया)

आज महत्त्वाचे व्यावसायिक करार यशस्वी होतील. प्रवासात काही फायदेशीर ओळखी होतील. भावाभावात सामंजस्य राहील. आज काही महत्त्वाचे फोन येतील.

वृषभ – ( शुभ रंग- तांबडा)

कार्यक्षेत्रात मान सन्मान वाढेल अनपेक्षित होणारे लाभ मनाला दिलासा देतील. आज वक्त्यांची भाषणे प्रभावी होतील. आज प्रवास मात्र कंटाळवाणे होतील शक्यतो टाळा.

मिथुन – (शुभ रंग- पांढरा)

आज तुम्ही वाणीत गोडवा ठेवून विरोधकांनाही आपलेसे कराल.  तुमचा उत्साह व कार्यक्षमताही वाढेल. कार्यक्षेत्र विस्तारेल. आज श्रमसाफल्याचे समाधान मिळेल.

कर्क – (शुभ रंग- क्रीम)

काही कौटुंबिक वाद असतील तर ते सुसंवादाने मिटू शकतील. अति महत्त्वाकांक्षांना थोडा ब्रेक लावून आपल्या तब्येतीकडे ही लक्ष द्यायला हवे. उधारी उसनवारी आज नको.

सिंह- ( शुभ रंग- हिरवा)

काही अनुकूल घटनांनी तुमच्या आत्मविश्वासात वृद्धी होईल. लॉक- डाऊन मुळे बराच काळ रखडलेली कामे मार्गी लागतील. जुन्या गुंतवणुकीतून मनाजोगता लाभ होईल.

कन्या- ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

नोकरीच्या ठिकाणी तुमच्या अधिकारात वाढ होईल. वाढीव जबाबदाऱ्या मात्र टाळता येणार नाहीत. मित्र आज दिलेली आश्वासने अजिबात पाळणार नाहीत. अवलंबून राहू नका.

तुळ – ( शुभ रंग -आकाशी)

नोकरीच्या ठिकाणी इतरांच्या भानगडीत न पडता फक्त आपले काम बिनचूक कसे होईल यावर लक्ष देणे हिताचे राहील. ज्येष्ठ मंडळींनी उपासनेत खंड पडू देऊ नये. नास्तिक ही आज देवाला एखादा नवस ट्राय करतील.

वृश्चिक -( शुभ रंग – जांभळा)

काही मानापमानाच्या प्रसंगाना तोंड द्यावे लागेल. आज थोडी संयमाची कसोटी राहील. ड्रायव्हिंग सावधपणे करा. आज फक्त आपला स्वार्थ बघा, परमार्थ झेपणारा नाही.

धनु – ( शुभ रंग- निळा)

आज तुमची तब्येत जरी नरम असली तरी तुमच्या कामातील उत्साह दांडगा राहील. व्यवसायिकांची आवक उत्तम राहील. दूरच्या प्रवासात खोळंबा संभवतो.

मकर – ( शुभ रंग – चंदेरी)

आज दिवस जरी अनुकूल नसला तरी तुमची काही येणी असतील तर ती वसूल होतील. मामा मावशी यांच्याकडून काही शुभवर्तमान कळेल. पत्नी चे मूड जपावे लागतील.

कुंभ -( शुभ रंग -गुलाबी)

आज आर्थिक धाडस आवाक्याबाहेर नको. काही फसव्या संधी येऊ शकतात. हातचे सोडून मृगजळामागे धावण्या पूर्वी पूर्ण विचार करावा. आज तुमचा चैन करण्याकडे कल राहील.

मीन – ( शुभ रंग- भगवा)

उच्च राहणी -उच्च विचारसरणी या तत्त्वाने वागाल. ज्येष्ठ मंडळींना प्रकृती उत्तम साथ देईल. विद्यार्थ्यांची अभ्यासातील गोडी वाढेल. गृहिणींना शारीरिक थकवा जाणवेल.

!! शुभम भवतु!!

श्री जयंत कुलकर्णी.

फोन ९६८९१६५४२४

( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.