Today’s Horoscope 6 November 2020: जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग –  वार…  शुक्रवार ,….. ​दि​. 6 नोव्हेंबर 2020

  • शुभाशुभ विचार –चांगला दिवस.
  • आज विशेष — सामान्य दिवस.
  • राहू काळ – दुपारी ०१.०० ते ३.००.
  • दिशा शूल – दक्षिणेस असेल.
  • आजचे नक्षत्र –  आद्रा.
  • चंद्र राशी –  मिथुन.

आजचे राशीभविष्य

मेष(शुभ रंग- मोतिया)

आज तुमच्यासाठी संमिश्र फळे देणारा दिवस असून काम कमी व दगदग धावपळच जास्त होईल. भावाभावात सामंजस्य राहील. आज काही महत्त्वाचे फोन येतील.

वृषभ –  ( शुभ रंग- तांबडा)

कार्यक्षेत्रात मान सन्मान वाढेल अनपेक्षित होणारे लाभ मनाला दिलासा देतील. आज वक्त्यांची भाषणे प्रभावी होतील. दैव आज तुमच्याच बाजूने आहे.

मिथुन (शुभ रंग- पांढरा)

आज तुम्ही वाणीत गोडवा ठेवून विरोधकांनाही आपलेसे कराल.  तुमचा उत्साह व कार्यक्षमताही वाढेल. कार्यक्षेत्र विस्तारेल. आर्थिक सुबत्ता येईल.

कर्क –  (शुभ रंग- क्रीम)

हट्टीपणा सोडा, मनाच्या लहरीपणास आवर गरजेचा आहे. अति महत्त्वाकांक्षांना थोडा ब्रेक लावून आपल्या तब्येतीकडे ही लक्ष द्यायला हवे. उधारी उसनवारी आज नको.

सिंह-  ( शुभ रंग- हिरवा)

काही अनुकूल घटनांनी तुमच्या आत्मविश्वासात वृद्धी होईल. लॉक- डाऊन मुळे बराच काळ रखडलेली कामे मार्गी लागतील. जुन्या गुंतवणुकीतून मनाजोगता लाभ होईल.

कन्या – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

नोकरीच्या ठिकाणी तुमच्या अधिकारात वाढ होईल. वाढीव जबाबदाऱ्या मात्र टाळता येणार नाहीत. मित्र आज दिलेली आश्वासने अजिबात पाळणार नाहीत.

तूळ  – ( शुभ रंग -आकाशी)

नोकरीच्या ठिकाणी इतरांच्या भानगडीत न पडता फक्त आपले काम बिनचूक कसे होईल यावर लक्ष देणे हिताचे राहील. ज्येष्ठ मंडळींनी उपासनेत खंड पडू देऊ नये. नास्तिक ही देवाला एखादा नवस करतील

वृश्चिक – ( शुभ रंग – जांभळा)

काही मानापमानाच्या प्रसंगाना तोंड द्यावे लागेल. आज थोडी संयमाची कसोटी राहील. फास्ट ड्रायव्हिंग टाळा. आज फक्त आपला स्वार्थ बघा, परमार्थ झेपणारा नाही.

धनु  -( शुभ रंग- निळा)

आज तुमची तब्येत जरी नरम असली तरी तुमच्या कामातील उत्साह दांडगा राहील. व्यवसायिकांची आवक उत्तम राहील. दूरच्या प्रवासात खोळंबा संभवतो.

मकर – ( शुभ रंग – चंदेरी)

आज दिवस जरी तितकासा अनुकूल नसला तरी तुमची काही येणी असतील तर ती वसूल होतील. मामा मावशी यांच्याकडून काही शुभवर्तमान कळेल.

कुंभ   (शुभ रंग -गुलाबी)

आज आर्थिक धाडस आवाक्याबाहेर नको. काही फसव्या संधी येऊ शकतात. हातचे सोडून मृगजळामागे धावण्या पूर्वी पूर्ण विचार करावा. आज तुमचा चैन करण्याकडे कल राहील.

मीन ( शुभ रंग- भगवा)

उच्च राहणी व उच्च विचारसरणी या तत्त्वाने वागाल. ज्येष्ठ मंडळींना प्रकृती उत्तम साथ देईल. विद्यार्थ्यांची अभ्यासातील गोडी वाढेल. गृहिणींना शारीरिक थकवा जाणवेल.
!! शुभं भवतु!!

 

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.