Today’s Horoscope 8 June 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग  वार –  मंगळवार दि. 8 जून  2021

  • शुभाशुभ विचार – वर्ज्य दिवस.
  • आज विशेष – शिवरात्री.
  • राहू काळ – दुपारी ३.०० ते ४.००.
  • दिशा शूल – उत्तरेस असेल.
  • आजचे नक्षत्र – कृतिका.
  • चंद्र राशी – १२.२३ पर्यंत मेष नंतर – वृषभ.

 

आजचे राशीभविष्य

मेष – (शुभ रंग- आकाशी)
शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. गृहिणी कौटुंबिक जबाबदारी हसतमुखाने पार पाडतील अनपेक्षितपणे काही रक्कम हाती येईल. तुमचे व्यवसायिक अंदाज खरे ठरतील.

वृषभ – (शुभ रंग- पांढरा)
कार्यक्षेत्रात नवीन हितसंबंध प्रस्थापित होतील. हौशी मंडळींना जीवाची मुंबई करण्यास पुरेसा पैसा उपलब्ध होईल. उपवरांना स्थळे सांगून येतील. जमाखर्चाचा तराजू समतोल राहील.

मिथुन – (शुभ रंग -मोरपिसी)
मोठ्या लोकांमधील उठबस फायदेशीर राहील. पैशाची कमतरता भासणार नाही. घराबाहेर तुमच्या वक्तृत्वाचा चांगलाच प्रभाव पडेल. काही अती हुशार मंडळी ही भेटणार आहेत डोके शांत ठेवलेले बरे.

कर्क – ( शुभ रंग- पिस्ता)
तुमची मनस्थिती उत्तम असेल. सगळ्यांशी गोड बोलून स्वार्थ साधून घेणे आज तुम्हाला चांगले जमेल. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून चांगला लाभ पदरात पडेल.

सिंह – ( शुभ रंग- गुलाबी)
मनसोक्त खर्च केला तरी ही पैशाची कमतरता भासणार नाही. आज दैव तुमच्या बाजूने असून तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यश मात्र नक्की मिळेल. आज देवही नवसाला पावेल.

कन्या – (शुभ रंग- सोनेरी)
शासकीय कामे रखडतील. आज तुमचा अध्यात्मिक मार्गाकडे ओढा असेल. सत्संनाने  मानसिक बळ मिळेल. विदेश गमनाची इच्छा असणाऱ्यांना संधी चालून येतील.

तूळ – ( शुभ रंग- चंदेरी)
आज काही नकारात्मक विचार मनात येतील काही क्षुल्लक गोष्टींनी ही राग अनावर होईल. वाहन चालवत असाल तर डोके शांत ठेवा. व्यवसायात आपल्या मर्यादा ओळखूनच गुंतवणूक वाढवा.

वृश्चिक – (शुभ रंग – सोनेरी)
महत्त्वाचे निर्णय घेताना द्विधा मनस्थिती होणार आहे. अशावेळी अनुभवी व्यक्तींचे सल्ले घ्यायला कमीपणा वाटून घेऊ नका. जोडीदार जे म्हणेल त्यास हो म्हणून मोकळे होणे वैवाहिक सुखाच्या दृष्टीने चांगले.

धनु – (शुभ रंग- भगवा)
नोकरी-धंद्यात उत्साही वातावरण राहील. विरोधक नमते घेतील, आज तुम्हाला श्रमसाफल्याचे समाधान मिळू शकेल. काही विसरलेली येणी अनपेक्षितरीत्या वसूल होतील.

मकर – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
कौटुंबिक स्तरावर आज काही मनासारख्या घटना घडणार आहेत. मुलांची अभ्यासातील प्रगती कौतुकास्पद राहील. घरासाठी काही शोभिवंत वस्तूंची खरेदी कराल.

कुंभ – (शुभ रंग- क्रीम)
शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असून आज तुम्हाला प्रत्येक कामात चांगला उत्साह राहील. खर्चावर मात्र नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. भावनेच्या भरात कोणालाही शब्द देऊन अडकू नका.

मीन – (शुभ रंग- मरून)
कौटुंबिक वाद असतील तर ते आज दुपारनंतर सुसंवादाने मिटू शकतील. काही दुरावलेल्या हितसंबंधात सुधारणा होईल. महत्वाची मेल्स येतील. कमी बोलून वाद टाळता येतील.

!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.