Today’s Horoscope 8 September 2020: जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग, मंगळवार, दि​. 8 ​​सप्टेंबर ​2020

  • शुभाशुभ…08 पर्यंत चांगला दिवस.
  • आज विशेष .. षष्ठी श्राध्द.
  • राहूकाळ…दुपारी  03.00 ते 04.30
  • दिशा शूल…उत्तरेस असेल
  • नक्षत्र… भरणी 08.26 पर्यंत नंतर कृत्तिका
  • आजची चंद्र राशी…मेष 15.10 पर्यंत, नंतर वृषभ.

आजचे राशीभविष्य

मेष (शुभ रंग-तपकिरी) आज तुमचे मन काही चंचल राहील काम कमी व धावपळच जास्त होईल हातचे सोडून पळत्याच्या मागे धावायचा आज तुम्हाला मी होईल. आज तुम्ही स्वतःचेच खरे कराल.

 

वृषभ (शुभरंग- चंदेरी) आज पैसा येण्या इतकेच पैसा जाण्याचेही मार्ग प्रशस्त असतील चैनी वृत्तीस थोडा लगाम घालणे गरजेचे आहे. कुसंगतीने प्रतिष्ठा धोक्यात येऊ शकते सतर्क राहा.

 

मिथुन (शुभ रंग – हिरवा) योग्य वेळी घेतलेल्या अचूक निर्णयांचे चीज होईल. व्यवसायात आवक मनाजोगती असेल.  पैशांअभावी रखडलेली कामे मार्गी लावू शकाल मित्रमंडळीत मोठेपणा मिळेल.  

 

कर्क (शुभ रंग- सोनेरी) अधिकारी वर्गाचे दडपण जाणवेल. आज नाकासमोर चालणे हिताचे राहील. मित्रमंडळींच्या फार नादी लागू नका. आज कायद्यात रहाल तरच फायद्यात राहाल. 

 

सिंह (शुभारंग – तांबडा) कार्यक्षेत्रात महत्त्वपूर्ण निर्णय घेताना अनुभवी मंडळींचा सल्ला घेणे खूप गरजेचे राहील. कोणतीही गोष्ट सहज साध्य नसली तरीही आज तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना दैवाची साथ मिळेल. 

 

 

कन्या (शुभ रंग -भगवा) भागीदारी व्यवसायात काही तीव्र स्वरूपाचे मतभेद होऊ शकतात. देण्या-घेण्याच्या व्यवहारात पारदर्शकता ठेवा. एकाच्या भरवशावर दुसर्‍याला आश्वासने देऊ नका. 

 

 

तूळ (शुभरंग  -स्ट्रॉबेरी) आज तुम्हाला काही विद्वान मंडळींचा सहवास लाभेल. चांगली वैचारिक देवाणघेवाण होईल, विचार प्रगल्भ होतील. आज धाडसाची कामे टाळा.

 

वृश्चिक (शुभ रंग -निळा) आज तुम्हाला कष्टाच्या प्रमाणात मोबदला कमी मिळेल, तरीही तुमचा कामातील उत्साह दांडगा असेल. कार्यक्षेत्रात काही किचकट प्रसंग चतुराईने सोडवाल.

 

 

धनु (शुभ रंग- आकाशी) आज तुम्हाला कामावर दांडी मारून थोडं करमणुकीस प्राधान्य द्यावे असे वाटेल. मुले आज्ञाधारकपणे वागणार आहेत. प्रेम प्रकरणांना आज ग्रीन सिग्नल आहे.

 

मकर (शुभ रंग – जांभळा) सामाजिक कार्यात तुमचा मान सन्मान वाढेल. आज एखाद्या घरगुती समारंभात हजेरी लावावी लागेल. आज तुम्हाला काही सज्जनांचा सहवास लाभेल.

 

कुंभ (शुभ रंग -गुलाबी) आज तुम्हाला एखादी गुप्त बातमी समजेल. गृहिणींनी झाकली मूठ झाकलीच  ठेवणे गरजेचे आहे. आज कोणालाही  ना मागता सल्ले देऊ नका. आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा.

 

मीन(शुभरंग  -मोतिया) तुमची भाग्योदयाकडे वाटचाल होईल. विरोधकांचा विरोध गोड बोलूनच थोपवून धरता येईल. यश हाकेच्या अंतरावर असल्याचे जाणवेल.

 

– जयंत कुलकर्णी
फोन. 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.