Today’s Horoscope 9 September 2020: जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग, बुधवार, दि​. 9 ​​सप्टेंबर ​2020

  • शुभाशुभ…दुपारी एकनंतर चांगला दिवस.
  • आज विशेष .. सप्तमी श्राध्द.
  • राहूकाळ…दुपारी 12.00 ते 01.30
  • दिशा शूल…उत्तरेस असेल.
  • नक्षत्र… कृत्तिका 11.15 पर्यंत नंतर रोहिणी
  • आजची चंद्र राशी… वृषभ.

आजचे राशीभविष्य

मेष – ( शुभ रंग – सोनेरी )
अति धावपळ टाळा. हार्डवर्क पेक्षा स्मार्ट वर्कला प्राधान्य द्या. व्यवसायात तुम्हाला काही उत्तम संधी चालून येणार आहेत. नव्या ओळखी फायदेशीर ठरतील.

 

वृषभ – ( शुभ रंग – पिस्ता )
व्यवसायातील वाढती स्पर्धा तुम्हाला बेचैन करेल. कौटुंबिक वाढत्या गरजांमुळे जमाखर्चाचा तराजू डळमळीत होण्याची शक्यता आहे. कायद्याची चौकट मोडू नका.

 

मिथुन – ( शुभरंग- चंदेरी )
स्थावर संबंधित अपुरे व्यवहार मार्गी लागतील. वास्तू व वाहन खरेदीसाठी कर्ज मंजुरी होईल. विद्यार्थी कौतुकास्पद कामगिरी करतील आज तुम्ही म्हणाल ती पूर्व कराल.

 

कर्क – ( शुभ रंग- पांढरा )
एखाद्या नव्या उपक्रमाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस अगदी योग्य आहे. आज तुमचे मनोबल वाढवणाऱ्या काही घटना घडतील. मिळणार्‍या संधींचे सोने करता येईल.

 

सिंह – ( शुभ रंग- हिरवा )
नोकरीच्या ठिकाणी आपल्या कामाव्यतिरिक्त फार खोलात शिरू नका. आज वरिष्ठ जितके विचारतील तितकेच बोला. अधिकार वापरण्याच्या संधी चालून येणार आहेत.

 

कन्या – ( शुभ रंग- केशरी )

नोकरदारांना  कंटाळवाणी कामे करावी लागणार आहेत. नोकरीत आज वरिष्ठांचे समाधान होणे अशक्य. आज तुमचा अध्यात्माकडे ओढा राहील. सत्संगाकडे  पावले वळतील.

 

तूळ – ( शुभ रंग- निळा )
आज तुम्हाला काही गोड बोली माणसे भेटतील. नवीन झालेल्या ओळखीवर लगेच विश्वास ठेवू नका. झटपट लाभाचा मोह टाळणे हिताचे राहील.

 

वृश्चिक – ( शुभरंग- स्ट्रॉबेरी )
व्यवसायात जाहिरात वाढवावी लागेल. काही तत्व गुंडाळून ठेवावी लागतील. जोडीदाराने दिलेले सल्ले महत्वाचे असतील. वैवाहिक जीवनात तू तिथे मी.

 

धनु – ( शुभ रंग- जांभळा )
आज काही अतिहुशार मंडळी संपर्कात येतील. मानसिक संतुलन ढळू न देणे गरजेचे. वैवाहिक जीवनात फार अपेक्षा नकोत. न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या झटकून टाकणे गरजेचे.

 

मकर – ( शुभ रंग- आकाशी )
कार्यक्षेत्रात आपले वर्चस्व टिकवून ठेवायचे असेल तर केवळ स्वप्नरंजनापेक्षा कृतीस प्राधान्य देणे गरजेचे आहे. आज तुम्हाला प्रकृती उत्तम साथ देईल.

 

कुंभ -( शुभ रंग- डाळिंबी )
घरात आर्थिक सुबत्ता नांदेल. परिवारात खेळीमेळीचे वातावरण राहील मात्र भावनेच्या भरात घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता आहे. संयम ठेवा.

 

मीन – ( शुभ रंग- गुलाबी )

आज तुम्ही आपल्या कर्तव्यापेक्षा मौजमजेस प्राधान्य द्याल. विलासी व चंगळवादी वृत्ती राहील. काही जुन्या मित्रांच्या सहवासात गतस्मृतींना उजाळा द्याल.

– जयंत कुलकर्णी
फोन. 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.