Pimpri Corona Update : शहरात आज 124 नवीन रुग्ण; 247 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात आज (शनिवारी, दि. 25) दिवसभरात 124 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 247 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिवसभरात तीन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहरात कोरोनाबाधितांची आजवरची संख्या 2 लाख 73 हजार 328 एवढी झाली आहे. तर आजवर 2 लाख 68 हजार 660 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दरम्यान, शनिवारी शहरातील दोन तर शहराबाहेरील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आजवर कोरोनामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील 4 हजार 429 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सध्या शहरात 970 रुग्ण सक्रिय आहेत. त्यातील 603 जणांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे असून 367 जणांवर शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

पिंपरी – चिंचवड शहरात रविवारी पालिकेच्या 69 आणि खासगी 132 लसीकरण केंद्रांवर 10 हजार 28 नागरिकांचे लसीकरण झाले. आजवर शहरातील 18 लाख 56 हजार 965 जणांनी लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.