Jagdish Mulik : आजचा विजय हा महाविकास आघाडीच्या अस्ताची सुरुवात – जगदीश मुळीक

एमपीसी न्यूज –  राज्यसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने तीन जागा जिंकत घवघवीत यश मिळवले याचा आनंदोत्सव पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने कसबा गणपती येथे साजरा करण्यात आला. 
शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik)  म्हणाले, ‘विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वात तीन जागा भारतीय जनता पक्षाने जिंकून महाविकास आघाडीला चपराक दिली आहे. हा विजय निश्चितपणे या भ्रष्ट महाविकास आघाडीच्या अस्ताची सुरुवात आहे येणाऱ्या विधान परिषद निवडणुकीतसुद्धा भारतीय जनता पक्षाचे सर्वच उमेदवार निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

Pimpri Corona Update: शहरात आज 53 नवीन रुग्णांची नोंद, 27 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

 

या वेळी मुळीक (Jagdish Mulik) यांच्यासह संघटन सरचिटणीस राजेश पांडे, सरचिटणीस राजेश येनपुरे ,दत्ता खाडे ,माजी स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने,  प्रमोद कोंढरे, रवींद्र साळेगावकर, जितेंद्र पोळेकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.