मंगळवार, जानेवारी 31, 2023

Todays’s Horoscope 30 November 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – Todays’s Horoscope 30 November 2022
वार – बुधवार.
30.11.2022
शुभाशुभ विचार- 9.00 पर्यंत चांगला दिवस.
आज विशेष- बुधाष्टमी.
राहू काळ – दुपारी 12.00 ते 1.30.
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आजचे नक्षत्र -धनिष्ठा 7.11 पर्यंत नंतर शततारका.
चंद्र राशी – कुंभ.
—————————————-
मेष – ( शुभ रंग- सोनेरी )
व्यवसायातील आवक वाढेल. आप्तस्वकीय व जिवलग मित्रांमध्ये तुमच्या शब्दाला वजन राहील. नवविवाहितांची स्वप्ने साकार होतील. दिवसाच्या उत्तरार्धात एखादा अनपेक्षित लाभ होण्याची शक्यता आहे.

वृषभ (शुभ रंग- पिस्ता )
व्यावसायिकांना वाढत्या स्पर्धेचा सामना करावाच लागणार आहे. उच्च अधिकारी वर्गास अधिकार वापरण्याच्या संधी चालून येतील. तरुण वर्गाने कुसंगती पासून लांबच राहिलेले बरे.

मिथुन ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी )
नोकरीच्या ठिकाणी कितीही राबलात तरी वरिष्ठांचे समाधान होणे शक्य नाही. उद्योग धंद्याच्या दृष्टीने प्रतिकूल दिवस असून आज नास्तिक मंडळी ही देवाला एखादा नवस बोलून बघतील.

कर्क (शुभ रंग- भगवा)
विवाह विषयक बोलणी उद्यावरच ढकला. जास्त लाभाच्या आशेने कुठलीही असुरक्षित गुंतवणूक करू नका. आज धाडसाची कामे टाळलेली बरी. झटपट लाभाचा मोह तर नकोच.

सिंह (शुभ रंग- नारंगी )
व्यवसायात वाढत्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी तयार राहावे लागेल. आज कार्यक्षेत्रात काही आव्हानक प्रसंगांना तोंड देण्यासाठी अनुभवींचे सल्ले उपयुक्त राहतील. घरात पत्नीच्या आज्ञेत राहणे वैवाहिक सुखाच्या दृष्टीने हिताचे राहील.

कन्या ( शुभ रंग- केशरी )
आज नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ कामगारांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करतील. संध्याकाळी कदाचित डॉक्टरांच्या भेटीचा योग संभवतो. व्यापारातील येणी वसूल होण्याची शक्यता आहे.

तूळ ( शुभ रंग- निळा)
तरुण मंडळींचा आज मौजमजा करण्याकडे कल असेल. स्वतःची हौस भागवण्यासाठी मनापासून खर्च कराल. त्यासाठी पैसाही उपलब्ध होईल. गृहिणी आज स्वतःसाठी वेळ काढतील. प्रकृती ठणठणीत राहील.

वृश्चिक (शुभ रंग- लाल)
मुलांची अभ्यासात उत्तम प्रगती दिसून येईल. गृह उद्योग चांगले चालतील. नोकरदारांना ऑफिसला दांडी मारायचा मूड असेल. गृहिणींना आज विश्रांतीची गरज भासेल.

धनु- (शुभ रंग- मोतिया) – Todays’s Horoscope 30 November 2022
साहित्यिक मंडळींकडून आज दर्जेदार लिखाण होईल. गायक कलाकार प्रसिद्धीच्या झोतात येतील. गृहिणींना शेजार धर्म पाळावेच लागतील. बेरोजगारांना नोकरीचे कॉल्स येतील.

मकर ( शुभ रंग- मोरपंखी )
आज कार्यक्षेत्रात तुमच्या नेतृत्वगुणांना योग्य वाव मिळेल. व्यावसायिकांची आवक मनासारखी राहील. नोकरीच्या ठिकाणी एखादी वाढीव जबाबदारी तुम्ही यशस्वीपणे स्वीकाराल. आज यशदायी दिवस.

कुंभ (शुभ रंग – राखाडी)
आज कुठेही आपलीच मर्जी चालवण्याचा तुमचा हट्ट असेल. आपला मोठेपणा सांभाळण्यासाठी आवाक्या बाहेर असलेला खर्चही कराल. फारच सडेतोड बोलून आज कुणाच्या भावना मात्र दुखावू नका.

मीन -(शुभ रंग – गुलाबी )
आज विदेशाशी संबंधित असलेले व्यवसाय उत्तम चालतील. वायफळ खर्चाचे प्रमाण मात्र आज वाढेल. कार्यालयीन कामासाठी दूरवरचे प्रवास घडणार आहेत. प्रवासात आरोग्य बिघडेल खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 9689165424

Pune news : विभागीय महारोजगार मेळाव्याचे 4 डिसेंबर रोजी आयोजन

Latest news
Related news