Tokyo Olympic 2020 : दुसरं पदक आलं ! बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूनं जिंकलं कांस्यपदक

चीनच्या बिंग जिआओचा केला पराभव

एमपीसी न्यूज – सुवर्णपदकाचे स्वप्न भंगलेल्या भारताच्या बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूनं टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून इतिहास रचला आहे. आज रविवारी झालेल्या कांस्यपदकाच्या लढतीत सिंधूने चीनच्या ही बिंग जिआओचा 21-13, 21-15 असा पराभव केला. या विजयासह सिंधू ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली आहे.

बिंग जिआओविरुद्धच्या सामन्यात सिंधूने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ दाखवत पहिल्या गेममध्ये 11-8 अशी आघाडी घेतली. यानंतर 16-10, 19-12 अशी आघाडी टिकवली आणि पहिला गेम 21-12 असा जिंकला. दुसऱ्या गेममध्येही भारतीय शटलरने चांगली सुरुवात केली आणि 5-2 अशी आघाडी घेतली. पहिला गेम गमावल्यानंतर, बिंग जिआओ दबावाखाली असल्याचे दिसून आले.

सिंधूने यापूर्वी 2016च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले. व्यतिरिक्त दिग्गज बॅडमिंटनपटू सायना नेहवालने लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने आत्तापर्यंत दोन कांस्यपदकांची कमाई केली आहे. याआधी मिराबाई चानुने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदकाची कमाई केली होती, त्यात आता सिंधूने भारताच्या झोळीत कांस्यपदक आणून ठेवले.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.