Pimpri : टोल नाका आंदोलन प्रकरण; भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांची अटक व सुटका

एमपीसी न्यूज – नाशिक फाटा येथील 2006 मध्ये टोल नाका फोडल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड शहरातील भाजपच्या प्रदेशवर काम करणा-या एका जुन्या पदाधिका-याला पोलिसांनी वारंट बजावत अटक केले होते. अटक करुन जामीनावर सुटका केली. दरम्यान, केंद्रात, राज्यात, महापालिकेत सत्ता असूनही भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय सुरु असून शहरातील वरिष्ठ नेते देखील दुर्लक्ष करत असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये झाली आहे.

नाशिक फाटा येथील टोलनाका बंद करण्यात यावा यामागणीसाठी 2006 मध्ये भाजपच्या निष्ठावान जुन्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. याप्रकरणात दोन दिवसांपूर्वी भाजपच्या पिंपरी-चिंचवड शहरातील जुन्या पदाधिका-याला पोलिसांनी अटक केली. तर, एका पदाधिका-याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. दोन कार्यकर्ते फरार असल्याचे दाखविण्यात आले आहे.

याबाबत जुन्या कार्यकर्त्यांनी शहरातील नेत्यांकडे धाव घेतली होती. परंतु, त्यांच्याकडे नेत्यांनी दुर्लक्ष केल्याची भावना भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. पक्ष नेतृत्व दखल घेत नसल्याने जुन्या कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पक्षाची सत्ता नसताना वेळोवेळी जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठविला. पक्षाच्या आदेशानुसार आंदोलने केली. त्यामुळे अनेक गुन्हे दाखल झाले. आता केंद्रात, राज्यात आणि महापालिकेत देखील भाजपची सत्ता आली आहे.

पंरतु, पक्षाच्या पढत्या काळात आंदोलन करणा-या जुन्या कार्यकर्त्यांवर आजही अन्यायच सुरु असल्याची भावना आहे. अटक केले जाते. याबाबत मदत मागण्यासाठी शहरातील वरिष्ठांकडे नेत्यांकडे गेले असता दुर्लक्ष केले जात असल्याची भावना कार्यकर्त्यांची झाली आहे. असेच दुर्लक्ष केले तर आगामी निवडणुकीत या नेत्यांचे काम कसे करायचे असा सवाल कार्यकर्ते उपस्थित करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.