_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Biggest day of the year : उद्या अनुभवता येणार वर्षातील सर्वात मोठा दिवस, पाहा गुगलचे खास डूडल…

Tomorrow is the biggest day of the year, Google presents Special Doodle

एमपीसी न्यूज – गुगलच्या वतीने विविध प्रकारची डुडल रेखाटली जातात. त्यात दिवसाचे, महिन्याचे महत्व अधोरेखित केलेले असते. त्यामुळे आजच्या गुगलच्या डुडलला विशेष अर्थ आहे. भौगोलिकदृष्ट्या उद्यापासून उत्तर गोलार्धात उन्हाळा सुरु होणार आहे.  उत्तर गोलार्धात मुख्यत्वे जून, जुलै आणि ऑगस्ट असे तीन महिने उन्हाळ्याचे मानले जातात. येथील उन्हाळा 21 जूनला सुरु होतो व 22 सप्टेंबरला संपतो. मात्र  दक्षिण गोलार्धात डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी हे तीन महिने उन्हाळ्याचे मानले जातात.

विषुववृत्ताच्या उत्तरेकडे राहणारे लोक 21 जून या दिवशी सर्वात जास्त सूर्यप्रकाश अनुभवतात. कारण 21 जूनला दिवसाचा कालावधी सर्वात जास्त असतो. म्हणजेच हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो.

मात्र विषुववृत्ताच्या दक्षिणेकडे म्हणजे दक्षिण गोलार्धातील हा सर्वात लहान दिवस असतो. त्यामुळे या भागात हिवाळा सुरु होतो. तर पार दक्षिणेकडे म्हणजे अंटार्क्टिकावर दिवस नसतो, तर संधीप्रकाशच असतो.

_MPC_DIR_MPU_II

आजच्या या डुडलमध्ये स्वच्छ सूर्यप्रकाश असलेल्या दिवशी हॉट एअर बलूनमध्ये बसलेला फ्लेमिंगो दाखवण्यात आला आहे.

आपल्याकडे या काळात पावसाळा असतो. कारण मोसमी पावसाच्या प्रदेशात पावसाळा हा आणखी एक ऋतू असतो. जगातील इतर भागात प्रामुख्याने उन्हाळा, हिवाळा आणि वसंत ऋतू मानले जातात. यात हिवाळा हा तीव्र आणि उबदार असा फरक असतो. म्हणजे ऑटम आणि विंटर असे त्याला म्हटले जाते.

योगायोगाची गोष्ट म्हणजे उद्या जगातील अनेक भागात सूर्यग्रहण दिसणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.