Maval/ Shirur: उद्याचा दिवस मतदार राजाचा; मावळमध्ये 22 लाख तर शिरुरमध्ये 21 लाख मतदार

एमपीसी न्यूज –  लोकशाहीचा मोठा उत्सव उद्या (सोमवारी) साजरा होणार आहे.  उद्याचा दिवस मतदारराजाचा असणार आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात 22 लाख 97 हजार 405 मतदार आपला हक्क बजाविणार आहेत. तर, शिरुर लोकसभा मतदारसंघातून 21 लाख 73 हजार 424 मतदार मतदान करणार आहेत. दोन्ही मतदारसंघातून 44 लाख 70 हजार 829 मतदार आपला हक्क बजावित आहेत. 

मावळ लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे पार्थ पवार, शिवसेना-भाजप महायुतीचे-श्रीरंग बारणे यांच्यासह 21 उमेदवार आणि शिरुर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे डॉ. अमोल कोल्हे आणि शिवसेना-भाजप महायुतीचे शिवाजीराव आढळराव यांच्यासह 23 उमेदवार आपले नशिब अजमावत आहेत. सोमवारी त्यांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद होणार आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघात तब्बल दोन लाख 73 हजार मतदार वाढले आहेत. त्यामध्ये महिलांची संख्या अधिक असून 1 लाख 43 हजार 559 महिला मतदार वाढल्या आहेत. तर, पुरुषांचे 1 लाख 30 हजार 311 मतदान वाढले आहे. 22 लाख 97 हजार 405 मतदार मावळचा नवीन खासदार ठरविणार आहेत.

मावळ लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघानिहाय पुरुष आणि महिला मतदार!

पनवेल मतदारसंघातून दोन लाख 88 हजार 830 पुरुष मतदार तर दोन लाख 50 हजार 357 महिला मतदार असे एकूण पाच लाख 39 हजार 187 मतदार आपला हक्क बजाविणार आहेत. कर्जत मतदारसंघातून एक लाख 42 हजार 328 पुरुष मतदार आणि एक लाख 37 हजार 462 महिला मतदार असे दोन लाख 79 हजार 790 मतदार आपला हक्क बजाविणार आहेत. उरण मतदारसंघातील एक लाख 46 हजार 22 पुरुष मतदार तर एक लाख 44 हजार 248 महिला असे दोन लाख 90 हजार मतदार मतदान करणार आहेत.

मावळ मतदारसंघातील एक लाख 74 हजार 816 पुरुष मतदार तर एक लाख 62 हजार 841 महिला असे एकूण तीन लाख 37 हजार 657 मतदार आपला हक्क बजाविणार आहेत. चिंचवड मतदारसंघातून दोन लाख 68 हजार 32 पुरुष मतदार तर दोन लाख 34 हजार 677 महिला असे पाच लाख 2 हजार 740 मतदार मतदान करणार आहेत. पिंपरी मतदारसंघातून एक लाख 82 हजार 884 पुरुष मतदार तर एक लाख 64 हजार 869 महिला मतदार असे तीन लाख 47 हजार 758 मतदार आपला हक्क बजाविणार आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघातून 12 लाख 2 हजार 912 पुरुष मतदार तर 10 लाख 94 हजार 454 असे एकूण 22 लाख 97 हजार 405 मतदार आपला हक्क बजाविणार आहेत.

शिरुर लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघानिहाय पुरुष आणि महिला मतदार!

जुन्नर मतदारसंघातील एक लाख 53 हजार 444 पुरुष आणि एक लाख 45 हजार 403 महिला असे एकूण दोन लाख 98 हजार 848 मतदार आपला हक्क बजाविणार आहेत. आंबेगाव मतदारसंघातून एक लाख 44 हजार 463 पुरुष मतदार तर एक लाख 35 हजार 871 महिला मतदार असे दोन लाख 80 हजार 334 मतदार आपला हक्क बजाविणार आहेत. खेड-आळंदी मतदारसंघातून एक लाख 54 हजार 286 पुरुष तर एक लाख 68 हजार 763 महिला असे तीन लाख 23 हजार 51 मतदार मतदान करणार आहेत.

शिरुर मतदारसंघातून एक लाख 93 हजार 76 पुरुष तर एक लाख 76 हजार 791 महिला असे एकूण तीन लाख 69 हजार 812 मतदार आपला हक्क बजाविणार आहेत. भोसरी मतदारसंघातून दोन लाख 26 हजार 780 पुरुष तर एक लाख 86 हजार 886 महिला असे एकूण चार लाख 13 हजार 680 मतदार मतदान करणार आहेत. हडपसर मतदारसंघातून दोन लाख 58 हजार 266 पुरुष तर दोन लाख 29 हजार 411 महिला असे एकूण चार लाख 87 हजार 699 मतदार आपला हक्क बजाविणार आहेत. शिरुर लोकसभा मतदारसंघातून 11 लाख 30 हजार 315 पुरुष आणि 10 लाख 43 हजार 125 महिला असे एकूण 21 लाख 73 हजार 424 मतदार मतदान करणार आहेत.

मावळ आणि शिरुर दोन्ही लोकसभा मतदारसंघातून 23 लाख 33 हजार 227 पुरुष आणि 21 लाख 37 हजार 579 महिला मतदार असे एकूण 44 लाख 70 हजार 829 मतदार आपला हक्क बजाविणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.