Pune : भगवे ट्रेकर्स ग्रुपच्या वतीने उभारला तोरणा किल्ला

एमपीसी न्यूज – सोमवार पेठमधील नरपतगीर चौकामधील भगवे ट्रेकर्स ग्रुपच्या वतीने तोरणा किल्ला उभारला असून हा किल्ला सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या किल्ल्यावर प्रशस्त तटबंदी बांधली असून किल्ल्यावर जाण्यासाठी पायऱ्या उभारण्यात आल्या आहेत. तसेच किल्ल्यामध्ये चिलखती बुरुज, घोडेजिन खांब, बुधला बुरुज, कानद खिंड दाखविण्यात आली आहेत.

शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना करीत असताना इ.स. १६४७ मध्ये अगदी पहिलाच घेतलेला हा किल्ला. शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले म्हणून या किल्ल्याचे नाव तोरणा किल्ला असे ठेवण्यात आले,
अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते दिलीप बहिरट यांनी दिली.

हा किल्ला उभारणीसाठी मायकल पंजलर, निखिल बहिरट, रोहित रापेटी, शुभम वरदेकर, विक्की गणाचारी, संतोष दराके व कुणाल मिरे यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.