Pimpri crime : दत्तक पुत्राचा छळ करून त्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्या प्रकरणी पालकांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – आई-वडील आणि अन्य दोघांनी मिळून दत्तक पुत्राला शिक्षण न देता त्याच्याकडून वर्षानुवर्षे काम करून घेतले. त्याचा छळ करून घरातून हाकलून देण्याची धमकी दिली.(Pimpri crime) या त्रासाला कंटाळून त्याने शुक्रवारी (दि. 11) विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

हिदायत अन्वर हुसैन शेख (वय 29, रा. पिंपरी) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या दत्तक पुत्राचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वडील अन्वर हुसैन हबीब शेख (वय 58), सईद अन्वर अन्सारी (वय 32), दोन महिला (सर्व रा. पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bharat Jodo Yatra : खेड तालुका पुरोगामी विचार मंच यांची राजगुरूनगर ते आळंदी भारत जोडो यात्रा संपन्न

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीला दत्तक घेतले. त्यानंतर त्यांना केवळ सातवी पर्यंतच शिक्षण दिले. शिक्षण अपूर्ण ठेऊन आरोपींनी त्यांच्या दुकानात फिर्यादीस काम करायला लावले. फिर्यादी हे आरोपींचा सगळा व्यवसाय सांभाळत होते. (Pimpri crime) मिळणारे उत्पन्न आई वडिलांना देत असत. मात्र आई वडिलांनी फिर्यादीस काहीही रक्कम दिली नाही. आरोपींची फिर्यादीस मानसिक त्रास देऊन शिवीगाळ केली. घराबाहेर हाकलून देण्याची धमकी दिली. वारंवार होणाऱ्या या त्रासाला कंटाळून फिर्यादीने शुक्रवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.