Sangvi : पैशांची मागणी करत विवाहितेचा छळ; सासरच्या चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – माहेराहून पैसे आणण्याचा तगादा लावून विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी सासरच्या चौघांवर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केतकी केशव गाडे (वय-30, रा. साने कॉलनी, मोरे वस्ती, चिखली) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.  त्यानुसार पती केशव रमेश गाडे (वय-34), सासू सुमन रमेश गाडे (वय-60), सासरे रमेश श्रावण गाडे (वय-66, तिघे रा. लोहगाव), शितल विजय भाटवडेकर (रा.चिपळूण) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी केशव यांचा 2008 मध्ये विवाह झाला. विवाहानंतर काही दिवसांनी आरोपींनी फिर्यादी यांना माहेराहून पैसे आणण्याची मागणी करत शारीरिक आणि मानसिक छळ केला. या छळाला कंटाळलेल्या केतकी यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. सांगवी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.