Bye-Election : कसबा पोटनिवडणुकीसाठी आज एकूण 17 उमेदवारांनी घेतले नामनिर्देशन पत्र

एमपीसी न्यूज : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठीही (Bye-Election) सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. आज इच्छुक उमेदवारांनी घेतले नामनिर्देशन पत्र घेतले आहे. यामध्ये भाजपकडून शैलेश टिळक, शिवसेनेतील उद्धव गटाचे संजय मोरे, विशाल धनवडे, तर वंचित बहुजनकडून भेंगडे यांनी नामनिर्देशन पत्र घेतले आहे.
तसेच, काँग्रेसकडून कौस्तुभ गुजर तर राष्ट्रवादीकडून नलावडे यांनी अर्ज घेतला असून अभिनेते अभिजित बिचुकले यांच्या पत्नी अलकृंता बिचुकले यांनीही अर्ज घेतला आहे. तर, सात अपक्षानीही घेतले नामनिर्देशन पत्र घेतले आहे.
Pune News : पुणे, पिंपरी-चिंचवडचे प्रसिद्ध उद्योजक नाना गायकवाड यांच्यावर हल्ला
त्यामुळे आज एकूण 17 जणांनी अर्ज घेतल्याने कसबा पोटनिवडणुकीसाठी चुरस वाढल्याचे दिसून येत आहे.