Varasgaon Dam Update : वरसगाव धरणातून एकूण 4122 क्यूसेक्स विसर्ग सुरू

एमपीसी न्यूज : वरसगाव धरणाच्या सांडव्यावरून (Varasgaon Dam Update) नदीपात्रामध्ये सुरू असणारा 2 हजार 346 क्यूसेक विसर्ग वाढवून दुपारी 2 वाजता 3 हजार 552 क्यूसेक व विद्युत निर्मिती केंद्राद्वारे 570 क्यूसेक्स म्हणजे एकूण 4 हजार 122 क्यूसेक करण्यात येत आहे. नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन यो.स.भंडलकर (सहाय्यक अभियंता, श्रेणी 1 खडकवासला, पानशेत व वरसगाव प्रकल्प) यांनी केले आहे.

Bollywood Boycott : हे बॉयकॉट का असते भाऊ?

पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त (Varasgaon Dam Update ) करण्याची शक्यता आहे याची नोंद घेण्यात यावी. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.