Warje : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावून चोरटे पसार

एमपीसी न्यूज- पादचारी महिलेच्या गळ्यातील 37 हजारांचे मंगळसूत्र दुचाकीरील चोरट्यानी हिसकावून नेल्याची घटना मंगळवारी (दि.25) पावणेसातच्या सुमारास वेदभवन जवळ घडली.

याप्रकरणी कोथरुड येथे राहणाऱ्या एका 41 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला त्यांच्या पतीसोबत रस्त्याने पायी जात होत्या. दरम्यान त्यांच्याजवळ दुचाकीवरून दोघेजण आले. त्यातील एकाने फिर्यादी महिलेच्या गळ्यातील 37 हजार 500 रुपये किमतीचे मंगळसूत्र जोरदार हिसका मारून चोरून दोघेही दुचाकीवरून पसार झाले.

याप्रकरणी दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वारजे पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.