Touching coincidence: माझ्या हृदयात आईचे नाव आहे…

I have my mother's name in my heart...

एमपीसी न्यूज – युवा अभिनेता सुशांतसिंह राजपूतची अचानक एक्झिट सगळ्यांनाच चटका लावून गेली. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्यामधील अनेक गुणांचा लोकांना परिचय झाला. त्यातील त्याचा एक हळवा कोपरा म्हणजे त्याचे त्याच्या आईवर जीवापाड प्रेम होते. सुशांतच्या लहान वयातच त्याच्या आईचे निधन झाले होते.  चाहत्याच्या एका प्रश्नाला उत्तर देताना सुशांतने एक योगायोग सांगितला होता.

चाहत्याने सुशांतला त्याच्या नावाचा अर्थ विचारला होता. ज्याचे उत्तर देताना सुशांत म्हणाला होता, ‘याचा अर्थ काहीही ते सर्वकाही असा होतो. पण सर्वात चांगली गोष्ट म्हणजे माझ्या नावाच्या मध्यभागी म्हणजे हृदयात माझ्या आईचे नाव म्हणजे ‘उषा’ (s’USHA’nt) आहे. काय अद्भुत गोष्ट आहे ना?’, असे सुशांतने सांगितले होते.

सुशांतच्या  मृत्यूच्या 11 दिवस आधी म्हणजे 3 जून रोजी त्याने इंस्टाग्रामवर शेवटची पोस्ट शेअर केली होती. त्याने स्वतःचा आणि आईचा फोटो एकत्र करून इंस्टाग्रामवर टाकला होता. या फोटोला कॅप्शन देताना त्याने लिहिले होते की, ‘भूतकाळाच्या आठवणी अश्रूंवाटे वाहत आहेत. अपूर्ण स्वप्नं आणि उद्याची आशा या दोघांमध्ये आयुष्य वाटाघाटी करत आहे. #माँ’, असा आशयाची त्याची ही पोस्ट होती.

सुशांतच्या आईचे 2002 मध्ये निधन झाले. जानेवारी 2016 मध्ये एका मुलाखती दरम्यान त्याने आईचा मृत्यू त्याच्या आयुष्यातील सर्वात वाईट क्षण होता, असे सांगितले होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like