Nigdi : तेलंग इंस्टीट्यूटमध्ये पर्यटन दिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे डॉ. अरविंद ब. तेलंग इन्सटीट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट चिंचवड, “जागतिक पर्यटन दिन” साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांच्या भित्तिचित्रे व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या.

या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे, पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालिका सुप्रिया करमकर, निशिता घाटगे व सन टुरिझमचे संचालक अशोक मलिक, बायोस्फीयर हॉलीडेजच्या संचालिका पल्लवी जोग, आणि वीणा वर्ल्डचे ओंकार गोलवलकर, प्राचार्य डॉ.अजय राय हे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथीच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने झाली. त्यानंतर प्रा. सौरभ जाधव यांनी उपस्थितांचा परिचय करून दिला. तसेच प्राचार्य अजय कुमार राय यांनी उपस्थित अतिथींचे स्वागत केले. यावर्षी पर्यटन दिनाचा विषय पर्यटन क्षेत्रातील नोकरीची संधी असा असल्याने उपस्थितांनी त्याविषयी माहिती सांगितली.

यावर्षी देखील “जागतिक पर्यटन दिनानिमित्त” विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत जान्हवी काळवीत, अजय शेटे आणि उत्कृष्ट पर्यटन स्थळाची माहिती देणारे पोस्टर या स्पर्धेत अजय वाढेकर श्वेता शेटे यांना अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले. पर्यटन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर आज मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित लोकांची गरज आहे. पर्यटन उद्योगामध्ये अनेक करिअर संधी उपलब्ध असल्याचे प्रमुख पाहुण्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन द्वितीय वर्षातील अपूर्वा राजपूत आणि सिद्धेश बारवे या विद्यार्थ्यांनी केले. शेवटी प्राचार्य अजय कुमार राय यांनी संस्थेचे कार्याध्यक्ष  वालचंद संचेती आणि मानद सचिव बी.व्ही.जावळेकर यांचे वेळोवेळी सहकार्य व बहुमुल्य मार्गदर्शन मिळत असल्याचे सांगून प्रा. दीपक मोरे यांनी आभार व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.