Tourism Day : पर्यटन म्हणजे निसर्ग जाणून घेण्याची संधी – धनंजय शेडबाळे

एमपीसी न्यूज : “पर्यटन म्हणजे आपण मोजकी प्रेक्षणीय स्थळे आणि मौजमजा अशीच त्याची व्याख्या करतो. प्रत्यक्षात त्यापलिकडे पर्यटनाच्या माध्यमातून आपल्यासाठी (Tourism Day) निसर्ग जाणून घेण्याची एक चांगली संधी असते”, असे मत सावरकर मंडळ निसर्गमित्र विभागाचे प्रमुख व पर्यावरणप्रेमी धनंजय शेडबाळे यांनी व्यक्त केले.

निगडी येथील नॉव्हेल्स एनआयबीआर कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमध्ये आज  (मंगळवारी)  रोजी जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी नॉव्हेल ग्रूफ ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक-अध्यक्ष अमित गोरखे, एनआयबीआर कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटचे प्राचार्य वैभव फंड आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना धनंजय शेडबाळे पुढे म्हणाले की, “पर्यटनाच्या निमित्ताने कोणत्याही ठिकाणी गेल्यानंतर अवती-भवती असलेला निसर्ग डोळसपणे पाहिला व अनुभवला पाहिजे.(Tourism Day) प्रत्येक पर्यटनस्थळी निसर्गापासून वेगळा आनंद व अनुभूती आपल्याला मिळेल. निसर्ग भरभरून देत असताना अशा ठिकाणी गेल्यानंतर निसर्गाची काळजी घेणेदेखील गरजेचे आहे. पर्यटनस्थळी मानवी संवेदनशीलता आणि जबाबदारीचे भान जोपासले गेले पाहिजे. प्लास्टिक कचरा करण्यापासून आपण दूर राहावे आणि इतरांनाही दूर ठेवण्याचा प्रयत्न करावा”.

Navratri Utsav loudspeaker : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट

प्राचार्य वैभव फंड म्हणाले की, “या वर्षीचा जागतिक पर्यावरण दिन रिथिंकींग टूरिझम या संकल्पनेवर साजरा करत आहोत. पर्यटनाला चालना मिळावी, पर्यटनस्थळांचा विकास व्हावा, यासाठी विचार करण्याची आवश्यकता आहे. अलिकडे अनेक पर्यटनस्थळी मर्यादेपेक्षा जास्त पर्यटक येणे, (Tourism Day) म्हणजेच ओव्हर टूरिझम दिसून येते. या ओव्हर टूरिझममुळे अनेक समस्या उद्भवतात. पर्यटन स्थळे, तेथील वास्तू व निसर्गाला हानी पोहोचते. हे टाळण्यासाठी पर्यटन या संकल्पनेबद्दल रिथिंकींग म्हणजेच पुनर्विचार करणे आवश्यक आहे”.

या निमित्ताने आयोजित प्रदर्शनासाठी विदयार्थ्यांनी ग्रामीण आणि शहरी जीवन, 7 सिस्टर्स ही पुर्वांचल राज्ये , ढेपेवाडा, बाली टेंपल यांच्या प्रतिकृती बनविल्या होत्या.(Tourism News) यासह म्युझिकल वर्ल्ड टूर, तसेच “पर्यटन आज, काल आणि उदया” या विषयावर नाट्यछटाही सादर करण्यात आली. प्रा.शंतनू देशपांडे यांनी स्वागत केले. सिमरन क्रूज व हर्ष यमनोल यांनी सूत्रसंचालन केले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.