Pune News : पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळ आजपासून सुरू; आणखी काय काय सुरु ? वाचा सविस्तर…

एमपीसी न्यूज : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळ बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला होता. परंतु आता पुण्यातील रुग्णवाढ हळूहळू नियंत्रणात येत आहे. त्यामुळे  जमावबंदीचं कलम 144 रद्द करण्यात आले आहे.

तसेच पुणे पुन्हा एकदा निर्बंधांतून शिथिल होत असून पर्यटन स्थळांसह अनेक गोष्टी आजपासून पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेनं सुरु होणार आहेत. शुक्रवारी उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. त्यानुसार आज पासून पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळ सुरु करण्यात येणार आहेत.  पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ही माहिती रविवारी संध्याकाळी जारी केली होती.

त्यामुळे निर्बंध हटविले या ठिकाणी यापुढे मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग, लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण करणे, सॅनिटायझेन याबाबतच्या नियमांचंही काटोकेरपणे पालन करणं बंधनकारक असल्याचं जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी सांगितले आहे. गेल्या 15 दिवसांच्या कोरोना रुग्णसंख्येचा आढावा घेऊन अखेर पुण्यासाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे.

काय काय सुरु?
पुणे जिल्ह्यातील सर्व जलतरण तलाव, खुली मैदाने, पर्यटनाच्या ठिकाणी असलेली सर्व दुकाने, हॉटेल्स आणि पर्यटन स्थळे आजपासून (24 जानेवारी) खुली करण्यात येत आहे. पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी रविवारी सायंकाळी तसं जाहीर केले. तसंच या आदेशानुसार लागू असलेले कलम 144 रद्द करण्यात आलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.