Pimpri : टोयोटा ग्लँझाला लाँच; कोठारी टोयोटामध्ये बुकिंग सुरु 

टोयोटा किर्लोस्कर मोटरने (टीकेएम) 

एमपीसी न्यूज – टोयोटा ग्लँझाला अधिकृत लाँच करून प्रीमियम हॅचबॅक विभागातील व्यवसायात प्रवेश केला. तरुण कार मालकांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी डिझाइन केलेली सर्वांत नवी ही प्रीमियम हॅचबॅक कार इंट्युटिव्ह फीचर्सच्या सुटने सजली असून, याचे डिझाइन अत्यंत आकर्षक आहे. त्याचबरोबर ही गाडी आरामदायी अनुभव आणि सुरक्षिततेचीही ग्वाही देते. कोठारी टोयोटामध्ये बुकिंग सुरु झाले आहे. 

पुण्यामध्ये टोयोटाचे प्रीमियम डीलर के कोठारी टोयोटा यांनी ही बहुप्रतिक्षित कार ग्राहकांना दाखविण्यासाठी टोयोटा ग्लांझाचा शुभारंभ थाटात केला. या शुभारंभ प्रसंगी पिंपरी-चिंचवड आरटीओचे प्रमुख आनंद पाटील, ऑटोमोबाईल इंजिनिअर, अमोल भोंडवे, मॅनेजिंग डायरेक्टर राजेंद्र कोठारी, आशिष कोठारी, हेड ऑपरेशन्स सेल्स अँड मार्केटिंग दीपक वाटेकर उपस्थित होते.

आरटीओचे प्रमुख आनंद पाटील म्हणाले, ”आजच्या काळात चांगली वाहने मार्केटमध्ये येणे गरजेचे आहे आणि ही नवीन कार बीएससिक्सची पूर्तता करत असल्यामुळे सामाजिकहित देखील राखले जाणार आहे”. के कोठारीचे डीलर प्रिन्सिपल आशिष कोठारी म्हणाले, ”आम्ही टोयोटाचा भाग असणेही सन्मानाची बाब असल्याचे नमूद केले आणि आमचे कर्मचारी व ग्राहक यांच्या प्रेमाच्या बळावर आज आम्ही पहिला वर्धापनदिन आनंदात साजरा करत असल्याचे सांगितले. इतक्या अल्पावधीत मिळालेले हे यश मी माझे कुटुंबीय आणि माझ्या सर्व सहका-यांना समर्पित करत आहे, असेही ते म्हणाले.

ग्लँझा हे नाव मूळ जर्मन शब्दावरून आला आहे ज्याचा अर्थ आहे तेजस्वी/ चमक/झळाळी असा आहे. आपल्या नावाला जागणारी ही नवी हॅचबॅक गाडी विशेष करून ज्याला समाजात उठून दिसायचं आहे. अशा तरुण ग्राहकाला डोळ्यांसमोर ठेवूनच डिझाइन करण्यात आली आहे. नवी टोयोटा ग्लाँझा जशी बाहेरून स्टायलिश आहे. तशीच ती आतूनही स्टायलिश आहे. चमकदार आणि आरामदायी अर्गोनॉमिक डिझाइन, स्वँकी अशाप्रकारचे अनोखे ड्यूएल-टोन इंटिरिअर्स आणि इर्रेझिस्टेबल स्मोक सिल्व्हर कलरचा वापर करून तयार केलेली केबिन खरोखरच क्लासिक दिसते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.